महर्षी कर्वे संस्था; सुरभी बापटला मिळाली संधी
रत्नागिरी, ता. 16 : महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिरगावमधील (Maharshi Karve Women’s Education Institute Shirgaon Ratnagiri) बीसीए कॉलेजमध्ये अंतिम वर्षात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या विद्यार्थिनीला ध्वजारोहणाचा मान देण्याचा निर्णय स्थानिक व्यवस्थापन समितीने घेतला. त्यानुसार यंदा स्वातंत्र्यदिनी मुळच्या गोवळ (ता. राजापूर) येथील सुरभी बापट हिने ध्वजारोहण केले. या अनोख्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. The student got the honor of flag hoisting

सुरभी बापट अतिशय हुशार, आदर्श विद्यार्थिनी असून बीसीएच्या अंतिम वर्षात तिने महाविद्यालयात प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे तिला ध्वजारोहणाचा सन्मान देण्यात आला. तिची कॅंपस इंटरव्ह्यूमधून विप्रो कंपनीत निवड झाली आहे. ध्वजारोहणाच्या वेळी सुरभी म्हणाली, मी मराठी माध्यमातून शिकल्यामुळे इंग्रजी बोलता येईल की नाही, याचे दडपण होते, भीती वाटायची. पण ध्येय ठरवले की कोणत्याही गोष्टीचा त्रास वाटत नाही. माझ्या यशात आई-वडिलांचा मोलाचा वाटा आहे. शिक्षकांनी लहानपणापासूनच संस्कार दिले, पुढे जाण्यासाठी प्रेरित केले. इंग्रजी बोलण्यासाठी प्रा. मुजावर यांनी आम्हाला इंग्रजी डायरी लिहिण्यासाठी सांगितले व मी इंग्रजी भाषणे ऐकू लागले, निबंध व डायरी लिहू लागले. त्यातून शब्दसंपदा वाढली. इंग्रजीचे वादळ आपण आत्मविश्वासाने पार करू शकतो. The student got the honor of flag hoisting

याप्वेळी शिरगाव प्रकल्प प्रमुख मंदार सावंतदेसाई, प्रकल्प समन्वयक स्वप्नील सावंत, सदस्य प्रसन्न दामले, डॉ. राजीव सप्रे, प्र. प्राचार्य स्नेहा कोतवडेकर, नर्सिंग कॉलेज प्राचार्य अर्चना बाईत आदी उपस्थित होते. या वेळी मंदार सावंतदेसाई यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृती जागवल्या. कोकणातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वीर सावरकर, आद्य क्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके, सानेगुरुजी, चाफेकर बंधू यांच्यासारख्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी भारतमातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिल्याचे सांगितले. The student got the honor of flag hoisting

ते म्हणाले की, भारताचा प्रवास आता स्वराज्यातून सुराज्यात होत आहे. शाळा, कॉलेजमधील तुम्ही मुले भारताचे भविष्य आहात. देशाचे नेतृत्व करण्यासाठी तुम्ही सक्षम व्हावे. संकल्प करूया भारतमातेला अधिकाधिक सक्षम, चांगले करण्याचा प्रयत्न करीन. प्रत्येकाने खारीचा वाटा उचलूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व लाभले आहे. त्यामुळे पुढच्या ३- ४ वर्षांत आपली अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकाची असेल. भारताचे भविष्य उज्ज्वल आहे. यावेळी विविध स्पर्धांतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कॉलेजमधील सर्व विद्यार्थिनी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. The student got the honor of flag hoisting
