जि.प. शाळांची पटसंख्या वाढण्यासाठी प्रयत्न
गुहागर, ता. 16 : तालुक्यातील वडद उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी असलेले डॉ. दत्ता मुळे यांनी मराठी शाळांची पटसंख्या वाढावी म्हणून जिल्हा परिषद शाळेतील 700 विद्यार्थ्यांना स्कुल बँग देण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमांतर्गत आजपर्यत 200 विद्यार्थ्यांना स्कुलबॅगचे वितरण त्यांनी केले आहे. Health officials resolve to give 700 schoolbags


डॉ. दत्ता मुळे हे अखिल भारतीय समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये शाळेत जाण्याची आवड निर्माण व्हावी. जिल्हा परिषदेच्या शाळेचा पट वाढावा. यासाठी डॉ. मुळे यांनी 5 ऑगस्टला वाढदिवसाच्या निमित्ताने 700 विद्यार्थ्यांना स्कुलबॅग देण्याचा संकल्प केला. या संकल्पपूर्तीची सुरवात त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या वडद गावापासून केली आहे. वडदमधील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नं. 1 आणि शाळा नं. 2 अटकवाडी या दोन शाळांमध्ये जावून त्यांनी विद्यार्थ्यांना स्कुलबॅग दिल्या. त्यानंतर 15 ऑगस्टपर्यंत गीमवीमधील जिल्हा परिषदेच्या 2 शाळा व तळवळी मधील 2 शाळांमध्ये जावून डॉ. मुळे यांनी स्कुलबॅगचे वितरण केले. याबाबत बोलताना डॉ. मुळे म्हणाले की, जिल्हा परिषद शाळांमध्ये देखील अन्य खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळत आहे. शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. जि.प. शाळेत कमी खर्चात उत्तम शिक्षण आणि शाळाबाह्य उपक्रमांमधुन व्यक्तिमत्त्व विकास होत असतो. तरीदेखील पालकांचा कल विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घालण्याकडे असतो. अशावेळी विद्यार्थ्यांमध्ये गावातील शाळेत जाण्याचे आकर्षण निर्माण व्हावे म्हणून आकर्षक स्कुल बॅग देण्याचा छोटासा उपक्रम राबविण्याचा निर्णय मी घेतला. Health officials resolve to give 700 schoolbags


स्वकमाईतील छोटासा हिस्सा समाजासाठी द्यावा या उद्देश्याने 5 ऑगस्टला वाढदिवसानिमित्त या उपक्रमाला सुरवात केली. याची माहिती माझ्या मित्रांना, माझ्यासोबत काम करणाऱ्या समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनीही या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामधुन 700 स्कुलबॅगचे वितरण करण्याचे निश्चित झाले. त्यापैकी 200 हून अधिक स्कुलबॅगचे वितरण पूर्ण केले आहे. या उपक्रमाला वडद, गीमवी, तळवली येथील शिक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. ग्रामस्थांनीही या उपक्रमाचे कौतूक केले आहे. Health officials resolve to give 700 schoolbags



