• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

भाजपाच्या वतीने मुस्लीम बंधूना राष्ट्रध्वज वितरण

by Guhagar News
August 15, 2023
in Ratnagiri
152 2
3
National flag distribution on behalf of BJP
299
SHARES
854
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता.15 : हर घर तिरंगा अभियान देशभर राबवण्यात येत आहे. याअंतर्गत भाजपा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी आमदार बाळ माने यांच्या नेतृत्वाखाली राजीवडा आणि मिरकरवाडा येथे मुस्लीम बंधू-भगिनींना राष्ट्रध्वजाचे वितरण करण्यात आले. लहान मुले व महिला, पुरुषांनी हे ध्वज सन्मानपूर्वक आपल्या घरावर लावू, असे सांगितले. National flag distribution on behalf of BJP

National flag distribution on behalf of BJP

भाजपाच्या वतीने सुमारे चारशे ध्वज राजीवडा येथे मौलाना अबुल कलाम आझाद नगरपालिका उर्दू शाळा क्र. १८ आणि मिरकरवाडा परिसरामध्ये वितरित करण्यात आले. या कार्यक्रमाला भाजपा नेते बाळासाहेब माने, सौ. माधवी माने, मिहीर माने यांच्यासमवेत भाजपा अल्पसंख्यांक आघाडीचे उपाध्यक्ष मन्सूर मुकादम, अमित विलणकर प्रमुख उपस्थित होते. रफिक शेख, जावेद म्हसकर, ताहिल कातलीकर, जैद सुवर्णदुर्गकर, जमीर सुवर्णदुर्गकर, अझर पाटील, फैय्याज हुनेरकर, अजमल हुनेरकर, सागर विलणकर आदी उपस्थित होते. National flag distribution on behalf of BJP

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाच्या सांगता कार्यक्रमानिमित्त हे ध्वज दिले आहेत. याचा योग्य तो सन्मान ठेवावा आणि आपल्या घरावर ध्वज नियमानुसार लावावा, असे आवाहन बाळासाहेब माने यांनी या वेळी सर्वांना केले. देशाच्या शतक महोत्सवावेळी २०४७ मध्ये आजची लहान मुले भावी पिढी कार्यरत असणार आहे. त्यांच्या मनात राष्ट्रप्रेमाची जाणीव जागृत करूया, नगरपालिकेच्या शाळांमध्ये सुद्धा चांगल्या दर्जेदार सुविधा निर्माण करूया, असे त्यांनी आश्वस्त केले. National flag distribution on behalf of BJP

National flag distribution on behalf of BJP

ध्वज वितरणाचे औचित्य साधून दि यश फाऊंडेशनच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वह्या, रंगपेटी, पट्टी आदी शालेय साहित्याचे वितरण बाळासाहेब माने व सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी शाळेच्या प्र. मुख्याध्यापिका समीना काद्री यांनी पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या वेळी उपशिक्षिका श्रीमती मसउदा मुल्ला, स्वयंसेविका रफत तांडेल, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा नगिना काद्री, रेशमा जांभारकर, इफ्फत मिरकर आदी उपस्थित होत्या.  National flag distribution on behalf of BJP

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNational flag distribution on behalf of BJPNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share120SendTweet75
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.