“मेरी मिट्टी मेरा देश” अभियान राबवत मातीला केले नमन, वीराना केले अभिवादन !!
गुहागर, ता. 12 : तालुक्यातील ग्रामपंचायत काताळेच्या वतीने भारत सरकार आणि मुंबई विद्यापीठ यांच्या सूचनानुसार “मेरी माटी मेरा देश” अभियान राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. “Meri Mitti Mera Desh” Campaign at Katale
यावेळी काताळे ग्रामपंचायत कार्यालय येथे सकाळी 9 वाजता सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे यांच्या हस्ते शुर वीरांची, स्वातंत्र्यसैनिकांची, भारत मातेची वेशभुषा धारण केलेल्या विद्यार्थ्यांच्या साक्षीने ध्वजारोहण झाले. यानंतर काताळे बारस्करवाडी स्टॉप येथुन प्रभात फेरी काढण्यात आली. यानंतर सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे, उपसरपंच प्रसाद शांताराम सुर्वे यांच्या हस्ते मातृभूमीच्या स्वातंत्र्या करता, तिच्या गौरवा करता, रक्षणाकरता बलिदान दिलेल्या वीराना शतशः नमन करण्याच्या पवित्र उद्देशाने उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण करण्यात आले. उपस्थित सर्वांनी प्रज्वलित दीप हातात घेऊन पंचप्राण शपथ घेतली आणि येथील पवित्र माती संकलित केली. यावेळी कातळे शाळा नंबर १ येथील विद्यार्थ्यांनी सुस्वर देशभक्तीपर समूह गीत सादर केले. उपस्थित सर्वांना ग्रामपंचायतीच्या वतीने वृक्षांचे वाटप करण्यात आले. “Meri Mitti Mera Desh” Campaign at Katale

या कार्यक्रमासाठी ग्राम विकास अधिकारी श्री महेंद्र निमकर, लिपिक अमोल सुर्वे, शिपाई दिपक बारस्कर, डाटा ऑपरेटर सोनाली पंडित, भाजप तालुका अध्यक्ष निलेश सुर्वे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर अजगोलकर, विनायक बारस्कर, जैद भाटकर, श्रावणी नाचरे, राजश्री कुळे, वैभवी यद्रे, पोलीस पाटील सचिन रसाळ, तंटामुक्ती अध्यक्ष शंकर येद्रे, मंगेश गडदे, प्रदीप सुर्वे, जयंत सुर्वे, विजय शिवलकर, भिकू बारस्कर, सुधाकर बारस्कर, माजी उपसरपंच आशीर्वाद बारस्कर, ज्ञानेश रसाळ, जगदीश गडदे, पंकज सुर्वे, बंटी तोडणकर, सौरभ अजगोलकर, प्रभाग संघ सचिव सुनीधी मोहिते, कृषीसखी स्मिता शिरधनकर, सीआरपी दीक्षा पवार, अंगणवाडी सेविका छाया सुर्वे, संगीता सुर्वे, आर्या रसाळ,फरीदा जांभारकर,आशासेवीका रश्मी गडदे,भारती सुर्वे,अर्चना बारस्कर, दत्ताराम कुळे, भिकाजी बारस्कर, गोविंद बारस्कर, अशोक डींगणकर, अनुष्का बारस्कर, रंजना बारस्कर, प्राजक्ता सुर्वे, संगीता सुर्वे, स्वामिनी सुर्वे, तन्वी गंधेरे, सुजाता चव्हाण, ज्येष्ठ शिक्षक रमेश पालशेतकर, खंडगावकर सर, राठोड सर, गुरसुळे सर, कोकाटे सर, मोहिते सर, आदींसह काताळे, तवसाळ, तवसाळ खुर्द परिसरातील ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी यांचा सहभाग लक्षणीय होता. या सर्व उपस्थितांचे या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या समारोपीय उपक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सरपंच सौ प्रियांका निलेश सुर्वे यांनी आभार व्यक्त केले. “Meri Mitti Mera Desh” Campaign at Katale
