• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

ग्रा. उमराठने राबविले “मेरी मिट्टी मेरा देश” अभियान

by Mayuresh Patnakar
August 10, 2023
in Guhagar
153 1
0
"Meri Mitti Mera Desh" campaign in Umrath
300
SHARES
858
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जनार्दन आंबेकर, उमराठ सरपंच
गुहागर, ता. 10 : आपल्या भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाल्यामुळे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव गेले वर्षभर विविध कार्यक्रम/उपक्रमांद्वारे संपूर्ण देशभरात राबविला जात असून समारोपनीय उपक्रमाला सुरूवात झालेली आहे. याचाच एक भाग म्हणून राज्यांत मेरी मिट्टी मेरा देश (मिट्टी को नमन विरों को वंदन) अर्थात माझी माती माझा देश अभियान राबविण्याच्या सुचना शासनाकडून ग्रामपंचायतीना आलेल्या आहेत. प्रत्येक राज्यामध्ये गाव व शहरांपर्यंत आपल्या माती विषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता व्हावी, हा या उपक्रमामागील शासनाचा मुख्य उद्देश आहे. “Meri Mitti Mera Desh” campaign in Umrath

"Meri Mitti Mera Desh" campaign in Umrath
शाळेच्या सभागृहात प्रमुख पाहुण्यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला

ग्रामपंचायत स्तरावर आलेल्या शासनाच्या सुचनेनुसार ग्रामपंचायत उमराठच्यावतीने  क्रांती दीनाच्या दिवशी बुधवार दि. ९.८.२०२३ रोजी जि. प. शाळा उमराठ न.१ येथे सदर अभियान मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. सर्व प्रथम सरपंच जनार्दन आंबेकर यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्तावनेत सदर उपक्रमाचा उद्देश सांगितला. त्या नंतर ज्या शूर विरांनी देशासाठी, स्वातंत्र्यासाठी व सुरक्षेसाठी बलिदान दिले त्या शूरवीरांना मानवंदना आणि आदरांजली वाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या शिलाफलकाचे अनावरण सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या उपस्थितीत प्रमुख पाहुण्या श्रीमती चंद्रभागा नारायण पवार (माजी स्वातंत्र्य सैनिक कै. नारायण रामचंद्र पवार यांच्या पत्नी) यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दिप(पणत्या) प्रज्वलित करून शूरवीरांना आदरांजली अर्पण केली. “Meri Mitti Mera Desh” campaign in Umrath

"Meri Mitti Mera Desh" campaign in Umrath
दिप(पणत्या) प्रज्वलित करून शहिद शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली

त्यानंतर प्रमुख पाहुण्या श्रीमती चंद्रभागा नारायण पवार यांच्या हस्ते सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या मदतीने ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिल्यानंतर राष्ट्रगीत, ध्वजगीत आणि राज्यगीत गाऊन मानवंदना देण्यात आली. वासंती आंबेकर व विनायक कदम यांनी सुद्धा गौरवगीत गाऊन शूरवीरांना आदरांजली वाहिली.  यावेळी शाळेच्या सभागृहात आयोजित छोटेखानी सभेमध्ये  उपस्थित प्रमुख पाहुण्या श्रीमती चंद्रभागा नारायण पवार यांचा सरपंच आंबेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तसेच उपस्थित मान्यवरांचा सुद्धा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. “Meri Mitti Mera Desh” campaign in Umrath

यावेळी पंचप्रण शपथ घेण्यात आली. यामध्ये भारतात २०४७ पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करू, गुलामीची मानसिकता मुळापासून नष्ट करू, देशाच्या समृद्ध वारसाचा गौरव करू, भारताची एकात्मता बलशाली करू आणि देशाचे संरक्षण करणाऱ्यांप्रति सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करू असे शपथेचे स्वरूप होते. “Meri Mitti Mera Desh” campaign in Umrath

सरतेशेवटी शासनाच्या सुचनेनुसार शाळा परिसरात सरपंच जनार्दन आंबेकर व शाळा मुख्याध्यापक प्रकाश नाटेकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच ग्रामस्थांनी आणलेली मुठभर माती कलशामध्ये एकत्र जमा करून पंचायत समिती गुहागर कार्यालयात पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आली. “Meri Mitti Mera Desh” campaign in Umrath

सदर कार्यक्रमाच्या वेळी ग्रामसेवक सिद्धेश्वर लेंडवे यांनी प्रस्तावना केली तर अनिल अवेरे सर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करत कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. यावेळी शाळेची विद्यार्थिनी कु. अपुर्वा सावंत तसेच मुख्याध्यापक प्रकाश नाटेकर सर यांनी सुद्धा शूरवीरांच्या गौरवपर मनोगत व्यक्त केले. “Meri Mitti Mera Desh” campaign in Umrath

"Meri Mitti Mera Desh" campaign in Umrath
वृक्षारोपण करताना सरपंच, मुख्याध्यापक आणि ग्रामस्थ

सदर कार्यक्रमाच्या वेळी उपसरपंच सुरज घाडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंत कदम, माजी अध्यक्ष संदीप गोरीवले, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष श्रीकांत कदम, पोलीस पाटील श्रीमती वासंती आंबेकर, उमराठ शाळा नं.३ चे शिक्षक शैलेश सैतावडेकर सर, अंगणवाडी सेविका राधा आंबेकर, वर्षा पवार, मदतनीस निलम जोशी, समृद्धी गोरिवले, आशा सेविका वर्षा गावणंग, रूचिता कदम, स्वयंसेवक शिक्षिका प्राची पवार, पालक श्रृती कदम, प्रतिष्ठित ग्रामस्थ अनिल पवार, नामदेव पवार, भिकू मालप, अशोक जालगावकर, विनायक कदम, महेश गोरीवले, क्षितिज गोरीवले, देवजी गोरीवले, नरेश पवार व पालकवर्ग तसेच विद्यार्थी वर्ग मोठय़ा प्रमाणात उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत उमराठचे कारकून नितीन गावणंग, रोजगार सेवक प्रशांत कदम आणि डाटा आॅपरेटर साईश दवंडे यांनी मोलाचे सहकार्य केले. “Meri Mitti Mera Desh” campaign in Umrath

Tags: "Meri Mitti Mera Desh" campaign in UmrathGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share120SendTweet75
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.