• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुटगिरी पातेवाडीतील रस्त्याची दयनीय अवस्था

by Ganesh Dhanawade
August 10, 2023
in Guhagar
120 1
0
Pathetic condition of road in Kutagiri
236
SHARES
673
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

नागरिकांना चिखलमातीतून करावा लागतोय प्रवास

गुहागर, ता. 10 : तालुक्यातील कुटगिरी पातेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.  साधारणत: दीड किमी लांबीच्या चिखल मातीच्या रस्त्यावरून नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. याबाबत ग्रामस्थांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्याची भेट घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माहीती दिली होती. Pathetic condition of road in Kutagiri

Pathetic condition of road in Kutagiri

या वाडीत साधारणतः ८० घरे असून २५० लोकसंख्या असलेली वाडी आहे. अनेक वर्षापूर्वी येथील अर्ध्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. त्याही रस्त्याला खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून नागरिकांना चालणेही मुश्कील झाले आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती कुटगिरी पातेवाडी येथील नागरिकानी श्रमदानातून केली होती. आता पावसाळ्यात या रस्त्याला खड्डे पडले आहेत. ग्रामस्थांनी अनेकवेळा लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्याशी भेट घेऊन रस्त्याच्या दुरावस्थेबाबत माहीती दिली. परंतु, आश्वासनापलीकडे त्यांच्या काहीच हाती आले नाही. Pathetic condition of road in Kutagiri

हा रस्ता उतार भागाचा असल्याने चिखलमातीतून वाहने चालवताना वाहने घसरून अपघात होत आहेत. काही वर्षापूर्वी या रस्त्यावरून एसटी वाहतुक सुरु होती. पंरतु रस्त्याच्या दयनीय स्थितीमुळे एसटी वाहतुक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामस्थ व विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. तरी कुटगिरी पातेवाडीकडे जाणाऱ्या या रस्त्याचे लवकरात लवकर डांबरीकरण करण्यात यावे, अशी मागणी कुटगिरी पातेवाडी ग्रामस्थांनी केली आहे. Pathetic condition of road in Kutagiri

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPathetic condition of road in KutagiriUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share94SendTweet59
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.