• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

बांधकाम विभागाकडून मागणीची तात्काळ दखल

by Manoj Bavdhankar
August 9, 2023
in Guhagar
68 1
0
Prompt consideration of demand by construction department
134
SHARES
383
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कोतळूक शिगवणवाडी येथील खड्डे बुजविल्याने वाहन चालक समाधानी

गुहागर, ता. 09 :  राज्य मार्गावरील कोतळूक शिगवणवाडी येथे पावसाचे पाणी साचून खड्डे पडले होते. याबाबत भाजपा गुहागर तालुका सरचिटणीस, कोतळूक ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त समिती अध्यक्ष सचिन ओक यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग गुहागर यांच्याकडे खड्डा बुजविण्याची लेखी निवेदन दिले होते. त्यानुसार खड्डा बुजविण्यात आल्याने वाहन चालकांकडून समाधान व्यक्त होत आहे. Prompt consideration of demand by construction department

कोतळूक शिगवणवाडी येथे पावसाचे पाणी साचून पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होत होते. मोठी दुर्घटना होण्याआधी या ठिकाणी पडलेला खड्डा बुजविण्याची लेखी निवेदनाद्वारे मागणी केली होती. सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागर अभियंता श्री निजसुरे यांनी मागणी करणारे सचिन ओक यांच्या समवेत प्रत्यक्ष पाहणी करून जमिन मालकांजवळ चर्चा केल्यानंतर पडलेला खड्डा कामगारांकडून बुजविण्यात आला. त्यामुळे वाहन चालक समाधान व्यक्त होत आहे. Prompt consideration of demand by construction department

तसेच रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडी, आवश्यक ठिकाणी असलेली गटारे काढणे ही कामेसुद्धा लवकरच सुरू करण्याचे बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले आहे. या ठिकाणी पडलेला खड्डा बुजविण्याच्या केलेल्या मागणीची तात्काळ दखल घेऊन खड्डा भरल्याने वाहन चालकांना येणारी समस्या दूर झाली आहे. त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम उपविभाग गुहागरचे सचिन ओक यांनी आभार व्यक्त करत उर्वरीत कामे सुद्धा लवकरच पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. Prompt consideration of demand by construction department

Tags: Construction DepartmentGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarPrompt consideration of demand by construction departmentUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याबांधकाम विभागमराठी बातम्यालोकल न्युज
Share54SendTweet34
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.