• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
25 October 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

महाड येथील भूगर्भातून येत आहेत विचित्र आवाज

by Guhagar News
August 8, 2023
in Bharat
141 1
0
Strange sounds from underground
277
SHARES
790
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

ग्रामस्थांना धास्ती; प्रशासन अलर्ट…

गुहागर, ता. 08 : रायगड जिल्ह्यात कसबे शिवथर (ता. महाड) गावात गेले दोन दिवस भूगर्भातून मोठे आवाज असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीच वातावरण आहे. महाडचे प्रांत अधिकारी डॉ. ज्ञानोबा बनापुरे, पोलीस निरीक्षक मारुती आंधळे व प्रशासनाने गावात येऊन ग्रामस्थ संवाद साधून ग्रामस्थांना योग्य त्या सूचना दिल्या आहेत. या भागाची पाहणी करण्याकरता सोमवारी भूगर्भ शास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आले असून ग्रामस्थांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. Strange sounds from underground

दरवर्षीच्या पावसाळ्यात रायगड जिल्ह्यातील महाड पोलादपूर तालुक्यातील काही भाग हा दरड कोसळणे, भूगर्भात घडणाऱ्या घटना यासाठी काहीसा संवेदनशील बनला आहे. शिवथरघळ गावात सुरुंग फोटासारखे मोठे आवाज भूगर्भात येत असल्याने ग्रामस्थांनी दोन दिवसापूर्वी आपली राहती घरे सोडून सुरक्षित ठिकाणी, मंदिर परिसरात आसरा घेतला होता. हे आवाज नेमके कोणत्या कारणामुळे येत आहेत, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र या सगळ्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शनिवारीही अशा स्वरूपाचे आवाज झाल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी दिली आहे. Strange sounds from underground

दरम्यान, शनिवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन टीम, एमआयडीसी पोलिस अधिकारी, महाड तहसीलदार, महाड प्रांत तसेच N.D.R.F टीम यांनी कसबे शिवथर गावाला भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. शनिवारी ज्या परिसरात मोठे आवाज येत असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली तेथील आवाज नेमके कशामुळे येत आहेत, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या आवाजांचा तपास करण्यासाठी भूगर्भशास्त्रज्ञांना पाचारण करण्यात आले आहे. दरम्यान, महाड तहसीलदार, प्रांत परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. ग्रामस्थांना सावधगिरीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी भूगर्भ शास्त्रज्ञ भेट देणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. Strange sounds from underground

१५ दिवसांपूर्वी रायगड जिल्हयात इर्शाळवाडी दुर्घटनेत अख्खी वाडी डोंगराखाली गाडली जाऊन जवळपास ८० माणसे दगावली होती. या घटनेनंतर प्रशासनाने पुन्हा एकदा दरडप्रवण क्षेत्रात सर्व्हे करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर शिवथर घळ येथे भूगर्भातून येत असलेले मोठे आवाज ग्रामस्थांच्या जिवाचा थरकाप उडवत आहेत. प्रशासनाने याची गंभीर दखल घेतली असून भूगर्भ शास्त्रज्ञ नेमके काय सांगतायत, हे पाहणे महत्त्वाचे आहे. Strange sounds from underground

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarStrange sounds from undergroundUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share111SendTweet69
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.