रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान”; तहसीलदार सौ. वराळे
गुहागर, ता. 08 : रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान” असे समजले जाते. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला, ही गरज ओळखून गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे यांनी केले. Guhagar revenue employees donated blood

दि. १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत गुहागर तहसील कार्यालयाच्या वतीने महसूल सप्ताह म्हणून साजरा होत आहे. या सात दिवसांमध्ये तहसील कार्याच्या वतीने तालुक्यात विविध सामाजिक उपयोगी उपक्रम राबवण्यात आले. या कार्यक्रमाच्या समारोपवेळी तहसील कार्यालयातील २५ कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डेरवण वालावलकर रुग्णालयाच्या डॉ. सुनिता झुंजरवाड, डॉ. रवी अग्रवाल यांनी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून रक्तदान करून घेतले. याकामी त्यांना रुग्णालयाच्या कर्मचारी सौ. नम्रता धाडगे, पर्णीका सुर्वे, समृध्दी गांधी, काजल पेडणेकर, अस्मिता सुतार, मयूर खापरे यांची मदत केली. Guhagar revenue employees donated blood

यावेळी पोलीस उप निरीक्षक पवनकुमार कांबळे, नायब तहसिलदार अतुल प्रभुदेसाई, डॉ. सुनिता झुंजरवाड, डॉ. रवी अग्रवाल, गुहागर मंडळ अधिकारी श्री. गवळी, अव्वल कारकून राजेश कोलवणकर, मंडळ अधिकारी शशिकांत साळुंके, संतोष सावर्डेकर, तलाठी श्री. परिहार आदींसह मंडळ अधिकारी, तलाठी व अन्य कर्मचारी उपस्थित होते. Guhagar revenue employees donated blood

