गुहागर, ता. 05 : तालुक्यातील दोडवली गावात शरदचंद्रजी पवार उद्यान विद्या महाविद्यालय येथील सीनिअर हॉर्टीचे कृषी दूत यांनी ग्रामसभा घेत येथील ग्रामस्थांजवळ शेतीविषयक विविध विषयांवर चर्चा केली. Agricultural guidance at Dodvali

दोडवली गावात कृषीदूत सुशांत भोगेकर, प्रथमेश शिरसाट, चिन्मय गायकवाड, उत्कर्ष पाटणकर, प्रणव कोद्या आदी विद्यार्थीनी ग्रामस्थांची ग्रामसभा घेतली. या ग्रामसभेमध्ये कृषीदूतांनी फळबाग लागवड व व्यवस्थापन, शोभिवंत झाडांची लागवडीबाबत अधिक माहिती दिली. व घेण्यात येणाऱ्या प्रात्यक्षिकं बद्दल माहिती दिली. तसेच टेक्नो इकॉनॉमिक सर्वे घेण्यात आला. या सर्वेत गावातील शेतीविषयक माहिती घेण्यात आली. Agricultural guidance at Dodvali

यावेळी ग्रामपंचायत सदस्य संजय हुमणे, माजी उपसभापती दत्ताराम निकम, माजी सरपंच सुभाष निमकर व ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामस्थांनी या सभेला उत्स्फर्तपणे प्रतिसाद दिला. Agricultural guidance at Dodvali

