• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पोलिस कर्मचाऱ्याला बॅटरीवरील व्हीलचेअर प्रदान

by Manoj Bavdhankar
August 5, 2023
in Ratnagiri
81 1
0
Wheelchair on battery was given to the policeman

पोलिस अमलदार भरत लोहकरे यांना बॅटरीवरील व्हीलचेअर देताना पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, डॉ. चंद्रशेखर निमकर, जयश्री गायकवाड, नीलेश माईणकर, महेश गर्दे, श्री. निकम आदी.

160
SHARES
456
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जाणीव फाउंडेशन, डॉ. चंद्रशेखर निमकर यांचे योगदान

रत्नागिरी, ता. 05 : कोरोना काळ असो वा कोणताही सण, समारंभ पोलिसांच्या योगदानामुळे सामान्य माणूस आनंदात असतो. त्यामुळेच पोलिसांना मदत करणे ही आमच्या सर्वांची जबाबदारी आहे. आज एका दिव्यांग पोलिस कर्मचाऱ्याला बॅटरीवरील व्हीलचेअर देतोय ही फार मोठी गोष्ट नाही. यापुढेही मदत करत राहू. पोलिसांना ताणतणावाला सामोरे जावे लागते. भविष्यात ताणतणावाचे व्यवस्थापन मार्गदर्शन सत्रही घेऊ, असे प्रतिपादन डॉ. चंद्रशेखर निमकर यांनी केले. Wheelchair on battery was given to the policeman

Wheelchair on battery was given to the policeman

रत्नागिरी पोलिस दलातील पोलिस अमलदार भरत लोहकरे यांना जाणीव फाउंडेशनच्या पुढाकाराने व डॉ. निमकर यांच्या माध्यमातून व्हीलचेअर बुधवारी प्रदान करण्यात आली. या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. पोलिस मुख्यालयाच्या महापुरुष हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अप्पर पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलिस उपअधीक्षक नीलेश माईणकर, राखीव पोलिस निरीक्षक श्री. निकम उपस्थित होते. प्रास्ताविकामध्ये जाणीव फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महेश गर्दे यांनी सांगितले की, कोरोना काळात व इतरवेळी जाणीवने पोलिसांच्या मदतीने विविध उपक्रम केले आणि करीत आहे. रक्तदात्यांची डिरेक्टरी अद्ययावत करत आहोत. पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या विनंतीनुसार श्री. लोहकरे यांना व्हीलचेअर देण्याचे ठरवले. त्याकरिता डॉ. निमकर यांचे मार्गदर्शन व विशेष योगदान लाभले. Wheelchair on battery was given to the policeman

यावेळी धनंजय कुलकर्णी यांनी सांगितले की, डॉ. निमकर हे मोठे व्यक्तीमत्व आहे. त्यांच्या योगदानामुळे आज लोहकरे यांना नोकरीवर येण्याकरिता उपयुक्त अशी व्हीलचेअर उपलब्ध झाली आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. मुळचे कर्जत (जि. रायगड) येथील पोलिस अंमलदार लोहकरे यांना २०११ मध्ये रेल्वे रुळावरील रुग्णाला स्ट्रेचरवरून नेताना दुखापत झाली व त्यानंतर अपंगत्व आले. त्यांनी मुंबईसह विविध ठिकाणी उपचार घेतले. कमरेच्या खालील भागात संवेदना नसल्याने त्यांना सुरवातीला त्रास झाला. ते सध्या पोलिस अंमलदार म्हणून काम करत आहेत. आता त्यांना व्हीलचेअर उपलब्ध झाल्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त केला. या व्हीलचेअरचा दुहेरी उपयोग आहे. त्यांना नोकरीवर येण्या-जाण्याकरिता व कार्यालयातही ते या व्हीलचेअरचा उपयोग करू शकणार आहेत. Wheelchair on battery was given to the policeman

यावेळी जाणीवचे उमेश महामुनी, संजय शिंदे, अवधूत मुळ्ये, अमित येदरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.  Wheelchair on battery was given to the policeman

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of GuhagarWheelchair on battery was given to the policemanगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share64SendTweet40
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.