गुहागर, ता. 3 : हजरत इमाम हुसैन यांच्या पवित्र स्मृतिप्रीत्यर्थ मुस्लिम बांधवांकडून दि. 29 जुलै रोजी धार्मिक कार्यक्रमांनी यौमे आशूरा दिन साजरा करण्यात आला. पवित्र मोहरम पर्वाच्या दहाव्या दिवशी आशूरा दिन साजरा करण्यात येतो. Shrungaratal Yaume Ashura day in excitement

यौमे आशुरा दिनानिमित्त शृंगारी मोहल्ला येथून सामूहिक दुवा पठण करीत बाजारपेठ येथील करबला मार्केट पर्यंत मिरवणूक काढण्यात आली. करबला मार्केट असणाऱ्या वृक्षावर निशाणकाठी ध्वज फडकविण्यात आला. तसेच आजच्या दिवसाचे करबला चे इतिहास सांगण्यात आले. त्यानंतर मौलाना खालिद यांनी दुवा ऐ अशुरा चे पठण केले. अल्लाह तालह सर्व लोकांना सुखी, समृद्धी, समाधानी ठेवो अशी प्रार्थना करण्यात आली. Shrungaratal Yaume Ashura day in excitement

यावेळी गुहागर पोलीस ठाण्यातर्फे चोख असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शृंगारतलीचे पोलीस पाटील विशाल बेलवळकर, ग्रामपंचायत पाटपन्हाळेचे उपसरपंच असीम साल्हे, सामाजिक कार्यकर्ते गुलाम भाई तांडेल, रियाज ठाकूर, शाबीर भाई साल्हे माजी सरपंच संजय पवार, दिनेश चव्हाण, अनंत पागडे तसेच हिंदु, मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. Shrungaratal Yaume Ashura day in excitement
