• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुणबी समाज विद्यार्थांचा गुणगौरव सोहळा संपन्न

by Guhagar News
August 3, 2023
in Guhagar
129 1
0
Merit ceremony of Kunbi Samaj students
253
SHARES
724
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

जो मनात जिंकतो तोच रणात जिंकतो; अमित आदवडे

संदेश कदम, आबलोली
गुहागर, ता. 03 : कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, शाखा तालुका गुहागर (ग्रामिण) व गुहागर तालुका कुणबी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड आबलोली यांच्या संयुक्त विद्यमाने शृंगारतळी येथील लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब सभागृहात कुणबी समाजातील विद्यार्थांचा सत्कार व गुणगौरव सोहळा नुकताच उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने विद्यार्थांच्या पाठीवर कौतूकाची थाप पडावी, हा या सामाजिक संघटनेचा मुख्य उद्देश्य आहे. Merit ceremony of Kunbi Samaj students

Merit ceremony of Kunbi Samaj students

या कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते शारदा मातेच्या व लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून, दिपप्रज्वलीत करुन, प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर समाजातील स्वर्गीय व्यक्तींना दोन मिनीटे स्तब्ध ऊभे राहून श्रद्धाजंली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिष्यवृत्तीप्राप्त, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती, माध्यमिक शिष्यवृत्ती, इयत्ता १० वी, १२ वी, तसेच पदविधर, पदव्युत्तर आणि  बी.एस.सी.,बी.कॉम., परिचारीका (नर्स),आदी. विद्यार्थांना भेटवस्तू देऊन मान्यवरांचे हस्ते सत्कार करुन  गौरविण्यात आले. Merit ceremony of Kunbi Samaj students

Merit ceremony of Kunbi Samaj students

यावेळी प्रमुख मार्गदर्शक अमित आदवडे सर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत तुकाराम,  लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो  या महामानवांचे विचार आपण अंगिकारुन मार्गक्रमण करुया आपण आज जे सुटाबुटात फिरतोय ते लोकनेते, माजी आमदार, स्वर्गीय रामभाऊ बेंडल साहेब यांचे आपल्या समाजावर असलेल्या अनंत उपकारामुळेच. एकट्याने १०० पाऊले चालण्यापेक्षा १०० जणांनी एक एक पाऊल पुढे टाकणे उचीत आहे. स्वर्गीय बेंडल साहेब या तालुक्याचे शिल्पकार आहेत माझ्या कुणबी समाजाला शिक्षण मिळावे, रोजगार मिळावा म्हणून त्यांनी गुहागर येथे संत तुकाराम शैक्षणिक छात्रालय चालू करुन ठेवले आहे. तर शृंगारतळी येथे पूर्वीचे संत तुकाराम ग्राहक भांडार आणि आताच्या गुहागर बाजाराचे  भव्य दालन उभे केले आहे. कुणबी पतसंस्थेच्या तीन शाखा गुहागर तालुक्यात आहेत. शिक्षण ही सतत चालणारी, जिवनावश्यक घटना असून माणसाच्या आयुष्यात शिक्षण कधीच पूर्ण होऊ शकत नाही. आपल्यात फक्त गुणवत्ता असून उपयोग नाही तर आपल्यात क्षमता असली पाहिजे. आपल्या आई-वडिलांनी आपल्याला घडविण्यासाठी खाल्लेल्या खस्ता आणि स्वर्गीय बेंडल साहेबांनी समाजावर केलेले उपकार कधीच विसरु नका. आपल्यातील नकारार्थी विचार दूर फेकून टाका धेय्य निश्चित करा, प्रामाणिक प्रयत्न करा क्षमता वाढवा जो मनात जिंकतो तोच रणात जिंकतो असे प्रतिपादन अमित आदवडे सर यांनी केले. Merit ceremony of Kunbi Samaj students

ते पुढे म्हणाले, जिवनात सतत संघर्ष हा करावाच लागतो बेंडल साहेबांनी सतत संघर्ष केला म्हणून आज आपण सुखाचे जिवन जगत आहोत तेंव्हा मला यश गाठायचेच आहे हा निश्चय मनाशी ठाम ठेऊन प्रयत्न करा यश निश्चितच मिळेल. शेतक-यांचे, कुणब्यांचे आई – बाप कधीच वृद्धाश्रमात ठेवले जात नाहित किंवा आत्महत्याहि करत नाहित, पाऊस पडला की, वाघ सुद्धा गुहेत असतो मग आमचा शेतकरी, कुणबी बांधव, भगिनी उन्हात आणि पावसातही शेतात राबत असतात. त्या कुणब्याची आपण अवलाद आहोत. तुंम्ही उच्च पदावर जा फार मोठे व्हा आणि समाज कार्याची जाणिव ठेवा समाज संघटनेला विसरु नका, असे आवाहनही अमित आदवडे सर यांनी केले. त्यानंतर कु. प्रणव टाणकर, माजी नगराध्यक्ष श्री.राजेश बेंडल, कुणबी समाजोन्नती संघाचे मुंबईचे तालुकाध्यक्ष श्री. कृष्णा वणे यांनीही मौलिक मार्गदर्शन केले. त्यानंतर श्री. रामचंद्र हुमणे गुरुजी यांचे अध्यक्षीय भाषण झाले. Merit ceremony of Kunbi Samaj students

Merit ceremony of Kunbi Samaj students

यावेळी विचारपिठावर अध्यक्षस्थानी श्री.रामचंद्र हुमणे गुरुजी, कृष्णा वणे, अमित आदवडे सर, पांडूरंग पाते, तुकाराम निवाते, माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, गणपत पाडावे, अनंत पागडे, महादेव साटले, विलास वाघे, प्रदिप बेंडल, अनंत कृष्णा पागडे, महादेव वणे, विजय अवेरे, सौ. श्रावणी पागडे, श्रीमती. वनिता डिंगणकर, संदेश कदम, काशिनाथ मोहिते, रविंद्र आंबेकर, तुकाराम दवंडे, सचिन म्हसकर, संतोष सोलकर, प्रमोद गोणबरे, विजय पागडे, शंकर मोरे, संतोष मोरे, महेश गोणबरे, विजय मसुरकर, संदिप गोरीवले, अमोल वाघे, संदिप पाष्टे, अनिल घाणेकर, काजुर्ली सरपंच श्रीमती. रुक्मिणी सुवरे,  पाटपन्हाळे सरपंच  तेलगडे, शंकर जोशी, रविंद्र कुळ्ये, वैभव बागवे, संजय आग्रे, गणेश खैरे, सुनिल रामाणे, विजय तेलगडे, संतोष हुमणे,आदी. मान्यवर उपस्थित होते. या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजनबध्द सूत्रसंचालन समाज शाखेचे सरचिटणीस श्री. तुकाराम निवाते यांनी केले तर अनंत पागडे यांनी सर्वांचे आभार मानले. Merit ceremony of Kunbi Samaj students

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMerit ceremony of Kunbi Samaj studentsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share101SendTweet63
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.