पाटपन्हाळे इंग्लिश मिडियम स्कूलने राबविला कृषीविषयक क्षेत्रभेट उपक्रम
गुहागर, ता. 02 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मिडियम पाटपन्हाळे विद्यालयातील प्राथमिक विभागातर्फे नुकताच भात लावणी शेती विषयक उपक्रम चिमुकल्या विद्यार्थ्यांनी संपन्न केला. The students planted the rice crop

विद्यालयातील इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत तालुक्यातील वरवेली येथील शेतकरी सचिन विचारे यांच्या शेतामध्ये भात पिकाची लावणी उपक्रम नुकताच राबविला. सदरच्या कृषी विषयक व क्षेत्रभेट उपक्रमांतर्गत राबवलेल्या लावणी उपक्रमामध्ये बहुसंख्य विद्यार्थी सहभागी झाले होते. The students planted the rice crop
स्थानिक शेतकऱ्यांनी भात पिकाची लावणी कशी करायची ? चिखलयुक्त शेतामध्ये लावणीचा आनंद कसा मिळतो?, शेतीचे काम करताना घ्यावयाची काळजी याविषयी बालविद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शेती ही आजच्या काळाची नितांत गरज आहे, हे मूल्य रूजविण्याचा विद्यार्थ्यांमध्ये ह्या उपक्रमातून प्रयत्न करण्यात आला. The students planted the rice crop

न्यू इंग्लिश स्कूल इंग्लिश मीडियम पाटपन्हाळे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. सौंदेकर यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम राबविण्यात आला. भात लावणी उपक्रमामध्ये सौ. घाडीगांवकर, सौ. सोलकर, सौ. पवार, सौ. मुंडेकर, श्रीम. साळवी, श्रीम. पवार या शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते. The students planted the rice crop
