गुहागर, ता. 02 : तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात लोकमान्य टिळक पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करण्यात आली. Tilak death anniversary and Annabhau Sathe Jayanti in Patpanhale School
या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते दहावीमधील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी वकृत्व उपक्रमात सहभाग घेतला होता. लोकमान्य टिळकांचा जीवन परिचय, देशकार्यासाठीचे बहुमोल योगदान, भारत देश स्वतंत्र होण्यासाठी लाभलेले योगदान आदी मुद्द्यांनुसार विद्यार्थ्यांनी वकृत्व सादर केली. कार्यक्रमाध्यक्षा व सांस्कृतिक विभाग प्रमुख ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस.एस. चव्हाण यांनी लोकमान्य टिळक यांचे सामाजिक कार्य, भारत देशासाठी लाभलेले मौलिक योगदान तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केलेले सामाजिक प्रबोधन कार्य आदी मुद्द्यांनुसार मार्गदर्शन केले. Tilak death anniversary and Annabhau Sathe Jayanti in Patpanhale School
हा कार्यक्रम सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ शिक्षिका सौ. एस. एस. चव्हाण यांच्या अध्यक्षतेत नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमानिमित्त विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री. एस.एस. घाणेकर, श्री. आर. एम. तोडकरी, श्री. एस.वाय. भिडे, श्री. एस.एम. आंबेकर, सौ. एन. पी. वैद्य आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीमधील विद्यार्थीनी कु. श्रेयशा नरळे हिने केले. Tilak death anniversary and Annabhau Sathe Jayanti in Patpanhale School