• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात ऋग्वेद संहिता स्वाहाकार

by Guhagar News
August 1, 2023
in Ratnagiri
75 1
0
Rigveda Samhita Svahakar at Srilakshmipallinath Temple
147
SHARES
420
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

रत्नागिरी, ता. 01 : मठ ता. लांजा येथील श्रीलक्ष्मीपल्लीनाथ मंदिरात येत्या ३० जुलै ते ४ ऑगस्ट या कालावधीत ऋग्वेद संहिता स्वाहाकार सुरू आहे. अधिक श्रावण मासानिमित्ताने हा कार्यक्रम घेण्यात आला आहे. Rigveda Samhita Svahakar at Srilakshmipallinath Temple

वायंगणी ता. कणकवली, सिंधुदुर्ग येथील वेदमूर्ती दत्तात्रय मुरवणे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा स्वाहाकार घेण्यात येत आहे. या स्वाहाकारास पुण्यातील घनपाठी वेदमूर्ती गोपाळ जोशी उपस्थित राहणार आहेत. ऋग्वेदातील १० हजार ५०० मंत्रांचे हवन या सप्ताहात होणार आहे. हिंदू राष्ट्राचे सर्वतोपरी सर्व शत्रूंपासून आणि सर्व नैसर्गिक, सामाजिक आपत्तींपासून संरक्षण होणे, सनातन हिंदू धर्माचा अधिकाधिक विस्तार होणे, समाज देशभक्त, बलशाली, धैर्यशील, अपराजित असा बदलणे,  सर्व समाज  संघटित करणे, सर्वांना चांगल्या प्रकारचे निरोगी जीवन मिळणे, समाजातील सर्व घटकांना अधिक सुबत्ता येणे, धर्मातील भेदभाव, द्वेष समूळ नष्ट होऊन सर्वांना एकमेकांबद्दल परस्परमैत्रीची भावना निर्माण होणे इत्यादी अनेक कारणांसाठी हा स्वाहाकार घेण्यात आला आहे. या सप्ताहात दररोज सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत वेदपठण आणि यज्ञ, दुपारी १ वाजता आरती- मंत्रपुष्प होईल. Rigveda Samhita Svahakar at Srilakshmipallinath Temple

या स्वाहाकाराकरिता येणाऱ्या तसेच देणगी देऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी श्रेयस मुळ्ये (9405917567/ 9028745038), नंदकुमार नेवाळकर (9270963574) किंवा उमेश आंबर्डेकर (9850082437) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. Rigveda Samhita Svahakar at Srilakshmipallinath Temple

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRigveda Samhita Svahakar at Srilakshmipallinath TempleUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share59SendTweet37
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.