• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
14 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

आरजीपीपीएल कंत्राटी कामगारांना १५ दिवसात कामावर घेणार!

by Ganesh Dhanawade
July 28, 2023
in Guhagar
123 1
0
RGPPL will hire the contract workers in 15 days

कामगारांशी चर्चा करताना मनसेचे तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उप जिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर.

241
SHARES
688
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

मनसे पदाधिकाऱ्यांना आरजीपीपीएल अधिकाऱ्यांचे आश्वासन

गुहागर, ता. 28 : तालुक्यातील अंजनवेल येथील रत्नागिरी गॅस अॅन्ड पॉवर कंपनीतील ठेकेदाराने येथे काम करणा-या कामगारांचा १ जुन पासुन पगार व गेटपास न दिल्याने कामगारानी १५ जुलै पासून काम बंद आंदोलन छेडले होते. अखेर कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. RGPPL will hire the contract workers in 15 days

मात्र, त्यानंतर १५ दिवस झाले तरी काहीच हालचाल होत नसल्याने गुरुवारी ( २७ रोजी) मनसे पदाधिकाऱ्यानी येथील व्यवस्थापनाशी चर्चा करताना येत्या १५ दिवसात नवीन निविदा प्रक्रिया होऊन नवीन कॉन्ट्रक्टमध्ये मागील काम करणाऱ्या सर्व कामगारांना कामावर घेऊ, असे आश्वासन आरजीपीपीएलचे मानव संसाधन विभागाचे प्रमुख डॉ. जॉन फिलिप्स यांनी दिले. RGPPL will hire the contract workers in 15 days

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी, उप जिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका अध्यक्ष सुनील हळदणकर यांनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. गुहागर ता. संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी म्हणाले की, नवीन निविदा प्रक्रीया साधारणतः १५ दिवसात पूर्ण होईल. नवीन कॉन्ट्रक्टमध्ये सर्वच्या सर्व कामगारांना समाविष्ट करण्यात येईल. कोणत्याही कामगारांवर अन्याय झाल्यास मनसे कदापी सहन करणार नाही, असा इशाराही आम्ही दिला आहे. RGPPL will hire the contract workers in 15 days

यावेळी कामगार म्हणाले की, जुना ठेकेदाराने आमचा पगार वेळेवर देत नव्हता. गेटपासहि देत नव्हता. याबाबत वेळोवेळी आम्ही आरजीपीपीएल कंपनीच्या अधिकाऱ्याना माहीती देत होतो. परंतु, प्रत्येकवेळी कंपनी प्रशासनाने उडवाउडवीचे उत्तरे दिली. आम्हा कामगारांची बाजूच कोण ऐकून घेत नव्हता. त्यानंतर नाईलाजास्तव आम्ही काम बंद आंदोलन छेडले. म्हणून आमचा अर्धा पगार देण्यात आला. परंतु अद्यापही आम्हाला कामावर घेण्यात आले नाही. आम्ही सर्व कामगार स्थानिक असून आरजीपीपीएल कंपनी आल्यापासुन आम्ही येथे काम करत आहोत, असे सांगितले. RGPPL will hire the contract workers in 15 days

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarRGPPL will hire the contract workers in 15 daysUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share96SendTweet60
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.