कालपासून मुसळधार पाऊस; चाकरमान्यांचे हाल
मुंबई, ता. 28 : मुंबईत पावसामुळे सकाळपासूनच लोकल रेल्वे सेवेला फटका बसला आहे. पावसामुळे अनेक स्थानकांत रेल्वे रुळांवर पाणी साचलंय. यामुळे तिन्ही मार्गांवरील रेल्वे सेवा उशिराने आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक २० ते २५ मिनीचे उशिराने सुरू आहे. तर मध्य रेल्वे १२ ते १५ मिनीटे उशिरा आहे. यासह हर्बल रेल्वे १५ ते २० मिनीटे उशिराने सुरू आहे. Railway services disrupted in Mumbai

राज्यात अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर करण्यात आला आहे. मुंबईत कालपासून मुसळधार पाऊस सुरुच आहे. पावसामुळे मुंबईकरांची पुरती दाणादाण झाली आहे. पावसामुळे मुंबईची लाईफलाईन लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. सकाळपासूनच चाकरमान्यांचे हाल होत आहेत. शुक्रवारी हवामान खात्याने राज्यातील ७ जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. मुंबईसह ठाण्यात देखील मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी भरल्याने नागरिकांचे हाल होतायत. घरात पाणी शिरल्याने नागरिकांना निवाऱ्यासाठी दुसरे ठिकाण शोधावे लागत आहे. Railway services disrupted in Mumbai

