एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीचा माजी विद्यार्थी
गुहागर, ता. 25 : तालुक्यातील चंद्रकला फाउंडेशन संचालित एक्सलंट अकेडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीचा माजी विद्यार्थी कुमार सोहम प्रकाश गुरसळे हा JEE 2023 परीक्षेत General गटात 4322 rank तर ओबीसी गटात 819 rank प्राप्त केली आहे. त्याचे विद्यालयाच्या वतीने संस्थेच्या सचिव सौ.स्नेहल सचिन बाईत यांनी शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करून गौरविले आहे. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.नेत्रा रहाटे तसेच सर्व शिक्षक आणि सोहमचे आई वडील व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. Soham Gursale success in JEE exam

हा कार्यक्रम सोहमच्या जन्मदिनी म्हणजेच २० जुलै २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. परंतु शासनाने दिलेल्या अतिवृष्टीच्या सुट्टीमुळे पुढे २४ जुले २०२३ रोजी करण्यात आला. त्यामुळे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन बाईत उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु त्या़नी त्यांच्या शुभेच्छा लेखी स्वरूपात पाठवील्या होत्या. त्यामध्ये सोहमने असेच उल्लेखनीय यश मिळवत यापुढेहि आपल्या संस्थेचे, शाळेचे, गावाचे, व तालुक्याचे नाव प्रगतीच्या उंच यशोशिखरावर न्यावे, अशा शुभेच्छा लेखी कळविल्या. Soham Gursale success in JEE exam

संस्थेच्या सचिव सौ. स्नेहल सचिन बाईत यांनीहि मनोगतातून सोहमला शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रहाटे, सर्व शिक्षक तसेच सोहमचे आई – वडील व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते. Soham Gursale success in JEE exam

