गुहागर, ता. 25 : तालुक्यातील एक्सलंट अकॅडमी इंग्लिश मिडीयम स्कूल आबलोलीच्या प्रशालेतील इयत्ता पाचवी मधील कु. रुद्र ऋषिकांत पवार याने 300 पैकी 228 गुण मिळवून ग्रामीण गुणवत्ता यादीत चौथा तर इ. आठवीमध्ये कु. रिद्धी प्रकाश मांडवकर हिने 300 पैकी 184 गुण मिळवून ग्रामीण गुणवत्ता यादीत पाचवा क्रमांक पटकावला आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात आले. Abololi Excellent Academy Student Merit List

या स्कॉलरशिप यशामध्ये दोन्ही विद्यार्थांच्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. नेत्रा रहाटे, सर्व मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे मार्गदर्शन लाभले. चन्द्रकला फाउंडेशन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सचिन चंद्रकांत बाईत, सचिव सौ. स्नेहल बाईत, प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.नेत्रा रहाटे, सर्व मार्गदर्शक शिक्षक सौ. साळुंखे, श्री. केंबळे, सौ. मुल्ला, सौ. शिगवण व पालक वर्ग यांनी अभिनंदन केले. Abololi Excellent Academy Student Merit List

