मुंबई, ता. 26 : मुर्तिकारांच्या रोजगाराला प्राधान्य देऊन राज्य सरकारने यंदा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती तयार करण्यास बंदी घातली नाही. मात्र, मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी सर्व महानगरपालिकांना कृत्रिम तलाव तयार करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी विधानपरिषदेत दिली. Plaster of Paris Ganesha idols allowed

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींवर सरसकट बंदी घालू नये. यामुळे मूर्ती तयार करणाऱ्या कारागीरांच्या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांना आर्थिक फटका बसेल. या उत्सवाच्या माध्यमातून राज्यात ७० ते ८० हजार कोटींची उलाढाल होते. त्यावरही परिणाम होईल, अशी भीती शेकापचे जयंत पाटील यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे मांडली होती. प्लास्टर ऑफ पॅरिसमुळे प्रदूषण होत नसल्याचे दिल्ली प्रदूषण महामंडळाने स्पष्ट केले आहे. गुजरात आणि हैदराबाद मध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती तयार केल्या जातात. असे असताना राज्य सरकारने अशा मूर्तीवर बंदी घालणे अन्यायकारक आहे. उलट कागदाच्या मूर्तीचा सरकारने सुचविलेला पर्याय अधिक प्रदूषणकारक असल्याचा मुद्दा पाटील यांनी मांडला. Plaster of Paris Ganesha idols allowed

त्यावर उत्तर देताना केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना यंदा बंदी घातली नसल्याचे सांगितले. दोन ते चार फूट मूर्तीला परवानगी दिली आहे. मात्र, यापुढे पर्यावरणाच्या दृष्टीने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवणे थांबले पाहीजे. कागदाच्याच मूर्ती बनवा हे बंधनकारक नाही. परंतु, भविष्याचा विचार करून मूर्ती बनविण्यासाठी शाडूची माती चिकट कशी तयार करता येईल, याबाबत अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन केली जाईल. मूर्ती विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवर कृत्रिम तलाव करण्याचे निर्देश मुंबई महानगरपालिकेला देण्यात आले आहेत. Plaster of Paris Ganesha idols allowed
