दि. २३ जुलैपासून ते ६ ऑगस्टपर्यंत पर्यटकांना बंदी
गुहागर, ता. 26 : सध्या सुरु असणारा मुसळधार पाऊस व दरडी कोसळण्याचा धोका पाहाता परशुराम घाटाच्या पायथ्यालगत असणारा सवतसडा धबधबा व अडरे येथील धरण पाणलोट क्षेत्र हे दोन पर्यटन स्थळे दि. २३ जुलैपासून ते ६ ऑगस्टपर्यंत पर्यटनाकरिता बंद केले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी आकाश लिंगडे यांनी दिली आहे. Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गालगत परशुराम घाटातील सवतसडा हा धबधबा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. या ठिकाणी पावसाळ्यामध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरु असते. परंतु हवामान खाते, कुलाबा मुंबई यांच्याकडून प्राप्त संदेशानुसार अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या कालावधीमध्ये सवतसडा धबधबा येथे अतिवृष्टीमुळे पाण्याचा प्रवाह वाढून पर्यटनासाठी येणाऱ्या जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism


तसेच अडरे येथील धरण पाणलोट क्षेत्रात पर्यटनासाठी लोकांची ये-जा होत असते. धरणाच्या पाण्याखाली अति उत्साही पर्यटक पाण्याच्या सांडव्याखाली भिजण्यासाठी उतरत असतात अशा वेळी पावसामुळे काही भाग निसरट झालेला असतो, तसेच अतिवृष्टीमुळे धरणाच्या सांडव्यावरून पाणी जास्त प्रमाणात वाहू लागते, अशा वेळी पाण्याचा अंदाज न आल्यामुळे पाण्याच्या प्रवाहामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पर्यटनासाठी या दोन्ही ठिकाणांवर बंदी घालण्यात आली आहे. Savatsada Falls and Adare Dam are closed for tourism

