झाडे लावा झाडे जगवा – तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे
गुहागर, ता. 25 : वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी आणि जीवनश्री प्रतिष्ठान गुहागर यांच्या वतीने शहरातील अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ तहसील सौ. प्रतिभा वराळे यांच्या हस्ते करण्यात आला. Tree plantation by Lions Club and Jeevanshree Pratishthan


यावेळी तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी झाडाचे महत्व आणि पर्यावरणामध्ये झाडाचे अनन्य साधारण महत्व कसे आहे, ते सांगितले. तसेच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश सर्वांना दिला. लायन्स क्लबचे अध्यक्ष श्री. वरंडे यांनी सुद्धा झाडाचे महत्व सांगितले आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम संयुक्तपणे व्यवस्थित पार पडला म्हणून सर्वांचे अभिनंदन सुद्धा केले. तसेच, प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावावे अशी सर्वांना त्यांनी आवाहन केले. Tree plantation by Lions Club and Jeevanshree Pratishthan


यावेळी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी प्रेसिडेंट ला. संतोष वरंडे, सेक्रेटरी ला. सचिन मुसळे, ला. माधव ओक, ला. प्रसाद वैद्य, ला. निखिल तांबट, ला.अमित कामेरकर, ला. नितीन बेडल, ला. मयुरेश बेंडल, ला. नरेश पवार, ला. सुधाकर कांबळे, ला. शैलेंद्र खातू, जीवनश्री प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सिद्धिविनायक जाधव, मनोज बोले, दादा सावंत, ओंकार वरंडे, शिक्षक मधुकर गंगावणे, सुजाता कांबळे, माजी नगराध्यक्षा सौ स्नेहा वरंडे, निलेश गोयथळे आदी उपस्थित होते. Tree plantation by Lions Club and Jeevanshree Pratishthan