गुहागर, ता. 24 : 100 हून अधिक मराठी नाटके, 30 हून अधिक हिंदी चित्रपट, मराठी मालिका व चित्रपट यामधून रंगदेवतेची आयुष्यभर सेवा करणारे ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे सोमवारी (ता.24) निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. गेले 15 दिवस रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. जयंत सावरकर यांच्या पार्थिवावर मंगळवारी (२५ जुलै) अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. Veteran colorist Jayant Savarkar No More

जयंत सावरकर यांचा जन्म 3 मे 1936 रोजी गुहागर येथे झाला. वयाच्या 20 व्या वर्षापासून त्यांनी अभिनयाला सुरुवात केली. अपराध मीच केला (गोळे मास्तर), अपूर्णांक (ब्रम्हे), अलीबाबा चाळीस चोर (खुदाबक्ष), अल्लादीन जादूचा दिवा (हुजऱ्या) सारख्या मराठी नाटकात त्यांनी काम केलं. त्यांच्या तळीराम (एकच प्याला), अंतु बर्वा या भूमिका मराठी प्रेक्षकांच्या मनात कायम घर करुन राहिल्या. चार दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयाने गाजवला. आपल्या कारकिर्दीची सुरुवातीची बारा वर्षे त्यांनी नोकरी सांभाळून, बॅक स्टेज आर्टिस्ट म्हणून काम केलं. मुंबई मराठी साहित्य संघात पडेल ते काम करणारा ते साहित्य संघाचे विश्वस्त असा प्रवास केला. एका नाटकाची निर्मिती देखील केली. Veteran colorist Jayant Savarkar No More

जयंत सावरकर यांनी अनंत दामले, केशवराव दाते, जयराम शिलेदार, दादा साळवी, नानासाहेब फाटक, पंडितराव नगरकर, परशुराम सामंत, बाळ कोल्हटकर, भालचंद्र पेंढारकर, रामदास कामत, राजा परांजपे, सुरेश हळदणकर यांच्यासह अद्वैत दादरकर, मंगेश कदम, चंद्रकांत कुलकर्णी, समीर विद्वांस या आणि अशा अनेक जुन्या नव्या पिढीतील दिग्दर्शकांसह काम केलं आहे. जयंत सावरकर यांनी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षस्थान भुषविले होते. त्यांची निवड बिनविरोध झाली होती हे विशेष. Veteran colorist Jayant Savarkar No More
सावरकर यांच्या निधनाच्या बातमीनं मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियावरुन जयंत सावरकर यांना चाहत्यांनी, नेटकऱ्यांनी आदरांजली वाहिली आहे. अनेक मराठी मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. Veteran colorist Jayant Savarkar No More
