घाटात २४ तास लक्ष, यंत्रणा सज्ज
गुहागर, ता. 24 : कोकणात पावसाचे थैमान सुरूच आहे. अशात मुंबई-गोवा महामार्गावरील महत्त्वाच्या परशुराम घाटात दरडीचा धोका कायम असल्याने येथे विज व अन्य सुविधा उपलब्ध केल्या आहेत. शिवाय जेबीसी व अन्य यंत्रणादेखील सज्ज ठेवण्यात आली आहे. Light arrangement at Parashuram Ghat

महामार्गावरील परशुराम घाटात चौपदरीकरण केल्यानंतर दरडीचा धोका वाढला आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आतातपर्यंत चार वेळा दरड कोसळली आहे. बुधवारी येथे पुरपरिस्थिती निर्माण झालेली असताना परशुराम घाटात दरड कोसळली होती. त्याआधी कुंभार्ली घाटात दरड कोसळली, त्यापाठोपाठ परशुराम घाटात दरड कोसळल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली होती. परशुराम घाटातील वाहतूक दरड बाजूला करेपर्यंत थांबविण्यात आली होती. त्या कालावधीत तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी चिरणी मार्गाने वाहतूक वळवली होती. मात्र त्यानंतर तातडीने रस्त्यावर आलेले दगड व माती हटवून आधी एकेरी व त्यानंतर दुहेरी वाहतूक सुरू करण्यात आली. Light arrangement at Parashuram Ghat

अजुनही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे परशुराम घाटातील दरडीचा धोका टळलेला नाही. त्यादृष्टीने राष्ट्रीय महामार्ग व ठेकेदार कंपनीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. घाटातील मध्यवर्ती ठिकाणी दरडीचा मोठा धोका असल्याने तेथे वीज उपलब्ध केली आहे. जेणेकरून रात्री अपरात्री रस्त्यावर आलेली माती किंवा दगड वाहतूकदारांना सहजपणे दिसावे असे नियोजन करण्यात आले आहे. त्याशिवाय दरड हटविण्यासाठी जेसीबी व पोकलेनची व्यवस्था तैनात केली असून घाटातील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात आले आहे. Light arrangement at Parashuram Ghat
