महाराष्ट्र सरकारनेही सुरक्षा व आरोग्य पुरस्काराने गौरविले
गुहागर, ता. 22 : आर्थिक दृष्ट्या अडचणीत असलेल्या रत्नागिरी गॅस आणि वीज प्रकल्पला 2022-23 या आर्थिक वर्षात दोन मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यामध्ये अमेरिका स्थित ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्कचा जलव्यवस्थापनसंदर्भातील पुरस्कार आणि महाराष्ट्र शासनाचा सुरक्षा व आरोग्य विषयातील उत्तम कामगिरीबाबतच्या पुरस्काराचा समावेश आहे. अशी माहिती आरजीपीपीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अग्रवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. RGPPL awarded by UN Global
संजय अग्रवाल म्हणाले की, जलव्यवस्थापन आणि सुरक्षा या विषयात आरजीपीपीएलचे मोठे योगदान आहे. आज वीज प्रकल्पासाठी लागणारे 100 टक्के पाणी रेन हार्वेस्टींगद्वारे साठवले जाते. तसेच वापरलेले पाणी देखील पुर्नवापरात आणले जाते. आमच्या प्रकल्पात पूर्वी वाशिष्ठी नदीमधुन जलवाहीन्यांद्वारे येणारे पाणी साठविण्यासाठी जलाशय बांधण्यात आला होता. आता प्रकल्प बंद असल्याने वाशिष्ठी नदीचे पाणी आम्ही घेत नाही. मात्र पावसाळ्यात प्रकल्प परिसरात पडणारे पाणी स्वच्छ करुन या जलाशयात साठवण्यात येते.देखभाल दुरुस्ती व आवश्यक त्यावेळी वीज निमिर्तीसाठी लागणारे पाणी या जलाशयातून घेतले जाते. वापरलेले पाणी पुन्हा स्वच्छ करुन पुर्नवापरात आणले जाते. त्यामुळे लाखो लिटर पाण्याची बचत आम्ही करत आहोत. आमच्या या कामाची दखल अमेरिकास्थित ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया या संस्थेने घेत बेस्ट प्रॅक्टीस चॅलेंज ऑन वॉटर मॅनेजमेंट ॲण्ड वॉश इन इंडिया 2022 या पुरस्काराने आम्हाला गौरविण्यात आले. RGPPL awarded by UN Global
जलव्यवस्थापनाबरोबरच आरजीपीपीएलमध्ये सुरक्षाविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते. दर शुक्रवारी प्रकल्पामध्ये सर्वांना सुरक्षेबाबतची शपथ दिली जाते. सुरक्षेसंदर्भात आवश्यक सर्व उपकरणे आमच्या कर्मचाऱ्यांना पुरवली जातात. प्रथम सुरक्षा हे आमच्या कंपनीचे धोरण राहील्याने आजपर्यंत एकही अपघात कंपनीमध्ये झालेला नाही. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांची नियमीत आरोग्य तपासणी, कामाच्या ठिकाणी विश्रांतीसाठी स्वतंत्र कक्ष, त्याच्यांसाठी सशुल्क आहाराची व्यवस्था अशा सुविधाही आहेत. या सर्वांचा परिणाम म्हणून आमच्याकडील सर्व कर्मचारी उत्तम आरोग्य असलेले आहेत. याचे सर्वेक्षण महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे करण्यात आले. त्यानंतर सेफ्टी ॲण्ड सुरक्षा अवार्डने आरजीपीपीएलचा गौरव करण्यात आला. RGPPL awarded by UN Global