गुहागर, ता. 21: तालुक्यातील चिखली येथे वीजवाहिनी दुरुस्तीसाठी वीजखांबावर चढलेल्या वायरमनला अचानक विजेचा धक्का लागला. मात्र तो झुल्यावर बसला असल्याने त्याला अडकून राहील्याने त्याचा जीव वाचला. जखमी वायरमनवर चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. “Zhulya” saves life of wireman

शृंगारतळी सबस्टेशनचा वरीष्ठ तंत्रज्ञ बापू कोतवडेकर चिखली पेट्रोलपंपाजवळील एका वीजखांबावर वीजवाहिनी दुरुस्तीसाठी चढला होता. त्याने वरती बसण्यासाठी बरोबर लाकडी झुलाही नेला होता. याच दरम्यान एका व्यक्तीने पथदीप लावल्याने वीजेचा धक्का वायरमनला लागला. तो लाकडी झुल्यावर बसल्याने झुल्यावरच टांगता राहीला खाली न पडल्याने थोडक्यात वाचला. यावेळी त्याच्या मदतीला असलेल्या सहकारी महिला कर्मचारी उर्मिला महादम हिने घटनेचे गांभीर्य ओळखून त्वरीत सबस्टेशनला फेन करून वीज बंद करण्यास सांगितले. यानंतर शिडीच्या सहाय्याने व ग्रामस्थामच्या मदतीने खाली उतरविण्यात आले. त्यानंतर प्राथमिक उपचारासाठी शृंगारतळी येथे आणण्यात आले. नंतर अधिक उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. “Zhulya” saves life of wireman

वीजेच्या खांबावर चढून विजेचा धक्का लागण्याची गुहागर तालुक्यातील ही दुसरी घटना आहे. तरी वीज कर्मचाऱ्यांनी वीजेच्या खांबावर दुरुस्ती करताना काळजी घेण्याची आवश्यकता आहे. “Zhulya” saves life of wireman
