• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

हेदवीच्या श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरात चोरी

by Guhagar News
July 21, 2023
in Guhagar
530 5
0
Hedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolen
1k
SHARES
3k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

गुहागर ता. 21 : तालुक्यातील हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरामध्ये चोरी झाली आहे. गेल्या चार महिन्यापासून ग्रामदेवता देवस्थानांच्या दानपेटीवर चोरांनी डल्ला मारावयास सुरूवात केली आहे. चोरीमध्ये पकडले गेलेले नसलेल्या चोरांची हिंम्मत अधिक वाढली असून निर्ढावलेल्या चोरांनी श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरामध्ये देवस्थानच्या दानपेटीवर डल्ला मारला आहे. Hedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolen

काही महिन्यापुर्वी गुहागर तालुक्यातील सुरळ येथील पीरबाबाच्या दर्गामधील दानपेटी चोरून नेल्यानंतर दानपेटी सापडली. परंतु जंगलात असलेल्या या दर्गाच्या चोरीमधील चोर मात्र अदयाप मिळून आलेला नाही. त्यानंतर तालुक्यातील त्याच पट्टयातील आणखी तीन मंदिरामधील दानपेटी चोरून ती फोडून गावातच टाकण्याचे प्रकार या चोराने केला होता. परंतु याप्रकरणी गावानेच कोणतीही तक्रार केली नाही. मात्र मंगळवारी रात्री गुहागर तालुक्यातील प्रसिद्ध असलेले हेदवी येथील श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरामध्ये झालेल्या चोरीप्रकरणी देवस्थानच्यावतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. दानपेटी फोडून आतील ३ हजार रूपये चोरीस गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या देवस्थानबरोबर याच गावापासून तीन किलोमिटर अंतरावर असलेल्या ग्रामदेवतेमधील दानपेटीही सदर चोरांनी चोरून त्यातील रक्कम चोरी केली आहे. याप्रकरणी गुहागर पोलिस निरिक्षक सचिन सावंत अधिक तपास करत आहेत. Hedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolen

देवस्थान कमिटीने सुरक्षीतता बाळगावी; पोलिसांचे आवाहन

दरम्यान गुहागर तालुक्यातील या वाढत्या चोरीच्या प्रकारांमुळे गुहागर पोलिस निरिक्षक सचिन सावंत यांनी तालुक्यातील सर्व देवस्थान कमिटींना आपल्या मंदिर, प्रार्थनास्थळे, पुतळे याठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सुचना केली आहे. मंदिरातील दानपेटीतील रक्कम दररोज काढण्यात यावी. मंदिरात गावातीलच ग्रामस्थांनी सुरक्षेच्या दृष्टीने एखादया व्यक्तीची नेमणुक करावी. मंदिराचा दरवाजा व गाभारा दरवाजा मजबूत करून घ्यावा. आदी सुचना संबधीत देवस्थान यांना केल्या आहेत. Hedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolen

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh TempleHedavi Shri Dasabhuj Lakshmi Ganesh Temple stolenLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share416SendTweet260
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.