गुहागर, ता. 21 : केरळ राज्यातील ग्रंथालय व साक्षरता चळवळीचे जनक श्री. पी. एन. पणिकर यांच्या स्मृती व सन्मानाप्रितीर्थ वाचन दिवस साजरा केला जातो. हा कार्यक्रम ज्ञान रश्मी वाचनालय व गुहागर हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्राचे वाचन केले. Reading Day celebrated in Guhagar High School


या कार्यक्रमाला ज्ञानरश्मी वाचनालयाचे अध्यक्ष श्री. राजेंद्र आरेकर सर व ज्ञानरश्मी वाचनालयाचे संचालक संजय मालप, ग्रंथपाल सौ. गौरी घाडे, शामली घाडे उपस्थिती होते. ज्ञानरश्मी वाचनालय विद्यार्थ्यांसाठी वाचनाची कायम मोफत सोय करत असते. आरेकर यांनी विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रेरित केले. यावेळी वरद भागवत या विद्यार्थ्याने वाचनालयासंबंधी आपले मनोगत व्यक्त केले. Reading Day celebrated in Guhagar High School


शाळेतील सर्व कार्यक्रम स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. दीपक कनगुटकर यांच्या प्रेरणेतून व शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा झाला. या कार्यक्रमाला शाळेच्या पर्यवेक्षिका सौ. कांबळे उपस्थित होत्या. श्री. मधुकर गंगावणे यांनी सूत्रसंचालन केले तर सौ तांबट कांबळे यांनी आभार मानले. Reading Day celebrated in Guhagar High School