शृंगारतळी येथे दि. १८ जुलै रोजी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन
गुहागर, ता. 20 : रिगल कॉलेज शृंगारतळी (Regal College Shringartali ) येथे प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ दि. १८ जुलै रोजी साजरा करण्यात आला. यावेळी विविध विभागांमधील प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. Welcoming First Year Students to Regal College

कार्यक्रमामध्ये प्रथम रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ. रेश्मा मोरे यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. आपल्या प्रस्ताविकेमध्ये मोरे मॅडम यांनी रिगल कॉलेज मध्ये उपलब्ध असलेल्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची, शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये घेतलेल्या उपक्रम व स्पर्धांची तसेच या शैक्षणिक वर्षामध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या १०० टक्के प्लेसमेंट बद्दल माहिती दिली. आपल्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रिगल कॉलेजची निवड केल्याबद्दल विद्यार्थ्यांचे व पालकांचे अभिनंदन केले. Welcoming First Year Students to Regal College

रिगल कॉलेज (Regal College) शृंगारतळीच्या सर्व शिक्षकांनी विद्यार्थी व पालकांना आपली ओळख करून दिली. तसेच कु. पूर्वा पाटील, कु. गौरी घाणेकर, कु. मिसबाह तुरुक, कु. निर्जला मोहिते व कु. अल्मास काझी या विद्यार्थिनीनी आपल्या मनोगतामध्ये दर्जेदार शिक्षण देऊन व सर्वांगीण विकास केल्याबद्दल रिगल कॉलेजचे आभार मानले. यावेळी गुहागर हायस्कुल मुख्याध्यापक श्री. सुधाकर कांबळे, हॉटेल हेमंत आणि फाईन डाईनचे मालक श्री. ओंकार संसारे, भूमी क्लासेसच्या सौ.राधिका कदम यांचा सत्कार रिगल संस्थेच्या संचालिका डॉ.सुमिता शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. Welcoming First Year Students to Regal College

यावेळी मुख्याध्यापक श्री. कांबळे यांनी प्रथम वर्षासाठी रिगल कॉलेजमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. अत्यंत कमी खर्चात दर्जेदार शिक्षण दिल्याबद्दल रिगल एज्युकेशन सोसायटीचे कौतुक केले. सौ. राधिका मॅडम यांनी पालकांचे आभार मानले. त्याचबरोबर रिगल कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांचा विकास व त्यांचे करियर कसे चांगले होऊ शकते याचे मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. सुमिता शिर्के यांनी विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन वाढावे यासाठी प्रामाणिकपणा, चिकाटी, जिद्द यांचे आपल्या आयुष्यात महत्वाचे स्थान पटवून दिले. स्वावलंबी भावनेने स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची गरज आजच्या चढाओढीच्या जीवनात खूप महत्वाची आहे. रिगल कॉलेजमध्ये नवीन वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रोत्साहन दिले व पालकांना आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्याची हमी दिली. Welcoming First Year Students to Regal College

नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. शाहरुख चोगले यांनी तर आभार प्रदर्शन सौ. समीरा नरवणकर यांनी केले. या कार्यक्रमासाठी रिगल कॉलेज शृंगारतळीचे सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. रिगल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्री. संजयराव शिर्के, संचालिका डॉ.सुमिता शिर्के व रिगल कॉलेज शृंगारतळीच्या प्राचार्या सौ.रेश्मा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. Welcoming First Year Students to Regal College
