गुहागर, ता. 20 : तालुक्यातील खालचापाट येथील श्री वराती देवीचा आषाढात होणारा चैत्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. हा उत्सव श्री वराती प्रासादिक मंडळ गुहागर यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. Guhagar Shree Varati Devi’s Chaitri Festival

यावेळी श्री वराती देवीला भाविक नवस बोलतात. आणि नवसाची प्रचिती आल्यावर (नवस पूर्ण झाल्यावर ) नवसाची फेड केली जाते. नवसाला पावणारी आई श्री वराती देवी अशी देवीची ख्याती आहे. अनेकांची श्रद्धास्थान असलेल्या देवीच्या चैत्री उत्सवला अनेक भाविकांनी येवून देवीचे दर्शन घेतले. संध्याकाळी देवीचा रक्षक असलेल्या म्हारक्या देवाला अर्पण करण्यात आलेल्या कोंबडे आणि बकऱ्याचा महाप्रसाद करण्यात आला. Guhagar Shree Varati Devi’s Chaitri Festival

चैत्री ही देवीची प्रथा अनेक वर्षापासूनची असुन श्री वराती देवी प्रासादिक मंडळ चैत्री उत्सव आज तागायत मोठ्या भक्तीभावात साजरा करत असतात. यंदाचा उत्सव श्री वराती देवी प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष श्री. विवेक वसंत मोरे यांचे मार्गदर्शनाखाली पार पडला. Guhagar Shree Varati Devi’s Chaitri Festival
