“अबोल प्रीतीची अजब कहानी” मालिकेतील मुख्य भूमिकेत
गुहागर, ता. 19 : सोनी मराठी वाहिनीवर सोमवारपासून प्रदर्शित झालेल्या “अबोल प्रितीची अजब कहाणी” या नव्या मालिकेत गुहागरची नात जान्हवी तांबट ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या मालिकेत दुहेरी भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. जान्हवीचे आजोळ गुहागर खालचापाट येथील कै. कमलाकर कोवळे, श्रीमती राजश्री कोवळे यांची ती नात तर राणी कोवळे (माहेरच नाव)शीतल तांबट हिची कन्या आहे. जान्हवीला सोनी वाहिनीवरील अबोल प्रीतीची अजब कहानी मालिकेत प्रमुख भूमिकेत संधी मिळाल्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Janhvi Tambat will appear in Sony Marathi serial


जान्हवीने सातवीला असताना पहिल्यांदाच ‘स्वर्गावर स्वारी’ या तीन अंकीनाटकात तिने भक्त प्रल्हादाची प्रमुख भूमिका साकारली होती. वक्तृत्व स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमधून ती लहानपणापासूनच आघाडीवर राहिली आहे. जान्हवीचे वडील प्रमोद तांबट यांना आपल्या लेकीला टीव्हीवर बघायचं होतं. ‘घेतला वसा टाकू नको’ या मालिकेत जान्हवीने भूमिका केली होती. मात्र वडिलांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरताना पाहताना जान्हवीचे वडील नव्हते. आजवर आपली आई आणि सर्व मामा, काका, नातेवाईकांनी आपल्याला खूप प्रोत्साहन व सहकार्य दिल्याचे तिने सांगितले. Janhvi Tambat will appear in Sony Marathi serial


डीबीजे महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने जान्हवीच्या अभिनय कला अकरावीपासूनच ती सांस्कृतिक विभागात दाखल झाली. विभाग प्रमुख राजरत्न दवणे यांच्यासह महाविद्यालयाने तिला मोठे सहकार्य केलं. बॅचलर ऑफ मॅनेजमेंट या विषयातून तिने पदवी प्राप्त केली आहे. बीएमएसचे विभाग प्रमुख आठवले व अन्य शिक्षकांचेही तिला सहकार्य लाभले. चिपळूचा सुपुत्र ओंकार भोजनेला जान्हवी आपला अभिनय क्षेत्रातील पहिला गुरु मानते. अभिनयाचे खरं शिक्षण आपल्याला ओंकारने दिल्याचे ती आवर्जून सांगते. Janhvi Tambat will appear in Sony Marathi serial


कोरोनाच्या काळात जान्हवी ऑडिशन देत होती. फोटोशूट करत होती. यातूनच अभिनेता अजिंक्य राऊतसह अबोल प्रितीची अजब कहाणीच्या मुहुर्ताप्रसंगी जान्हवी तांबट तिला अनेक संधी मिळत गेल्या. सचिन खांडेकर दिग्दर्शित घेतला वसा टाकू नको, शेगावीचे गजानन महाराज या मालिकेत दिग्दर्शक नितीन काटकर, मुख्य भूमिका साकारणारे अमित फाटक यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. त्याचबरोबर शुभांगी भुजबळ, विलास उजवणे, त्यांच्या पत्नी यांनीही मार्गदर्शन केल्याचे ती म्हणाली. Janhvi Tambat will appear in Sony Marathi serial


या संधीचे मी नक्की सोने करेन दिग्दर्शक अजय मयेकर यांनी छान पद्धतीने माझ्याकडून काम करून घेतले आहे. दिग्दर्शक मयेकर, सोनी मराठी यांनी संधी दिल्याबद्दल आभारी आहे. काहीतरी वेगळं, हटके पाहण्याची संधी अबोल प्रतीची अजब कहाणी या मालिकेतून सर्वांना मिळेल, या मालिकेला भरभरून प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही जान्हवी तांबट हिने केले. Janhvi Tambat will appear in Sony Marathi serial

