गुहागर, ता. 18 : खरे-ढेरे-भोसले महाविद्यालाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग, नेचर क्लब व सामाजिक वनीकरण विभाग गुहागर यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. गुरूवार दिनांक १३ जुलै, २०२३ रोजी सकाळी ९.३० वा. महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. Tree plantation program completed in KDB College

यावेळी श्री. अमित निमकर यांनी जागतिक तापमानवाढ कमी करण्यात वृक्षारोपण उपक्रम महत्त्वाचा असल्याचे सांगितले. प्रा. डॉ. आनंद कांबळे यांनी संतुलित पर्यावरणासाठी पृथ्वीवरील किमान 33% जमीनवर वनीकरण असणे गरजेचे असल्याची जाणीव करुन दिली यासाठी हा उपक्रम योग्य असल्याचे स्पष्ट केले. Tree plantation program completed in KDB College

सदर वृक्षारोपण कार्यक्रमात सामाजिक वनीकरण विभागातील श्री. अमित निमकर, महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.पद्मनाभ सरपोतदार, NSS कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. आनंद कांबळे, प्रा. नीलकंठ भालेराव व नेचर क्लब प्रमुख प्रा. शीतल मालवणकर तसेच महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागातील बहुसंख्य विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग–शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहभागने नोंदवून कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला. Tree plantation program completed in KDB College
