गुहागर, ता. 17 : पाचेरीसडा, पाचेरीआगर व कोळवली या गावांसाठी एसटी चालू करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने वेळोवेळी ठराव देण्यात आले होते. या ठरावांना मान्यता मिळून बस चालू करण्यात आली आहे. यासाठी श्री. पाथरे, श्री शिंदे, श्री पवार, व रत्नागिरीचे श्री. काळे साहेब यांचे मोलाचं सहकार्य लाभले. याबाबत तीन गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले. Bus service started for three villages

पाचेरीसडा कोंडवाडीतून वस्तीची गाडी सकाळी ६.३० वाजता सुटणारी काजरोळकर वाडी, पाचेरीआगर आबलोली मार्गे श्रृंगारतळी. तसेच पाचेरीसडा येथे सकाळी ८.३० वाजता येणारी नरवण- रत्नागिरी ही गाडी पाचेरीआगर, पाचेरीसडा पाणबुडी मार्गे रत्नागिरीला रवाना होणार आहे. तसेच रत्नागिरी वरुन परतीची गाडी दुपारी २ ते २.३० वाजता सोडल्यास परतीच्या प्रवासाची गैर सोय दुर होईल. तसेच भातगांव-मुंबई, किंवा भातगांव-विरार गाडीची सोय झाल्यास भातगांव पासून सर्व गावांना त्याचा फायदा होईल. तरी सहकार्य लाभावे, अशी विनंती ग्रामस्थांनकडून करण्यात आली आहे. Bus service started for three villages

याबाबत सामाजिक कार्यकर्ते श्री. धर्मानंद यादव, श्री. वसंत सागवेकर, श्री.काजरोळकर गुरूजी, श्री. सतिश जामसुतकर, श्री. शेंबेकर गुरूजी, श्री. राजन खरे, दोन्ही गावचे सरपंच उपसरपंच तसेच श्री. अशोक यादव पाचेरीसडा, श्री. रमेश यादव पाचेरीआगर, श्री. निलेश यादव पाचेरीआगर, श्री. सागर डिंगणकर, पोलीस पाटील श्री. शंकरजी डिंगणकर, श्री शंकरजी घाणेकर, तंटामुक्तीचे श्री शशिकांत यादव. उपसरपंच श्री. संतोषजी आंब्रे, श्री अनिलजी डिंगणकर या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. Bus service started for three villages
