पदग्रहण सोहळ्याचे दिवशी 6 जणांनी स्विकारले सदस्यत्व
गुहागर, ता. 14 : लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीच्या अध्यक्षपदी संतोष वरंडे, सचिव म्हणून सचिन मुसळे आणि खजिनदार म्हणून मनिष खरे यांची नियुक्ती करण्यात आली. पदग्रहण सोहळ्याचे दिवशी 6 जणांनी या क्लबचे सदस्यत्व स्विकारले. त्यांना लायन नितीन गांधी शपथ दिली. 6 more people joined Lions Club
गुहागरमधील भंडारी भवनमध्ये लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचा पदग्रहण सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याला डॉ. विजय रिळकर, उद्योजक नितीन गांधी व विजय रटावा उपस्थित होते. डॉ. विजय रिळकर, झोन चेअरपर्सन विजय रटावा व गेल्यावर्षीचे अध्यक्ष शामकांत खातू यांनी संतोष वरंडे यांना मानाचा वुडन गॅवेल देवून अध्यक्ष पदाची सुत्रे सोपवली.
त्यानंतर सचिव सचिन मुसळे आणि खजिनदार मनिष खरे यांना कॉलर प्रदान करण्यात आल्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून गुहागरच्या तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे उपस्थित होत्या. 6 more people joined Lions Club
यावर्षी गुहागर हायस्कुलचे मुख्याध्यापक सुधाकर कांबळे, डॉ. मयुरेश बेंडल, खातू मसाले उद्योगचे संचालक शैलेंद्र तथा भैय्या खातू, तालुक्यातील अग्रणी मोबाईल व्यावसायिक राहुल शेटे, संगणक प्रशिक्षण संस्था चालविणारे संतोष मोरे आणि सराफ विशाल गुहागरकर या सहाजणांनी लायन्स क्लबचे सदस्यत्व स्विकारले. उद्योजक नितीन गांधी यांनी नव्या सदस्यांना लायन्स क्लबचे ध्येय सांगून सदस्यत्वाची शपथ दिली. 6 more people joined Lions Club
यावेळी चिपळूण, सावर्डे येथील लायन्स क्लबचे पदाधिकारी, भारतीय जीवन विमा निगमचे शाखाधिकारी, विकास अधिकारी शशिकांत कान्हेरे, विमा क्षेत्रातील व्यावसायिक, खातू मसाले उद्योगचे संस्थापक शाळीग्राम खातू, यांच्यासह तालुक्यातील विविध क्षेत्रात काम करणारी मंडळी उपस्थित होती. 6 more people joined Lions Club