गुहागर, ता. 14 : तालुक्यातील प्रा. आ .केंद्र हेदवी अंतर्गत उपकेंद्र वेळणेश्वर येथे डोळ्यांची अत्याधुनिक तपासणी मोफत शिबीर संपन्न झाले. या शिबीरात वेळणेश्वर, वाडदई व साखरी आगार गावातील लोकांना उत्तम सेवा देण्यात आली. एनसीडी स्क्रीनिंग, कॅन्सर स्क्रीनिंग ही करण्यात आले. यावेळी रक्त दाब तपासणी, मधुमेह तपासणी, कॅन्सर विषयी माहिती देण्यात आली. Health camp completed at Velneshwar sub-centre


सदर कार्यक्रमात उपकेंद्र वेळणेश्वरचे समुदाय आरोग्य अधिकारी श्रीमती.शितल खोले यानी सर्व व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमती नेत्रा ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.घनश्याम जांगिड, डॉ.दिनेश जोशी, वेळणेश्वर ग्रामपंचायत सरपंच चैतन्य धोपावकर, सामाजिक कार्यकर्ता वाडदई विनायक कांबळे व शाळा प्रतिनिथी मारुती होडेकर साखरी आगर, दत्तात्रय मुद्दमवार आरोग्य सहाय्यक प्रा.आ.केंद्र हेदवी, विनायक साबळे, समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र पालशेत, विवेक विनोद पाटीदार उपकेंद्र अडुर, श्रीमती प्रशीका बाबुराव थोरात समुदाय आरोग्य अधिकारी उपकेंद्र चिंद्रावळे, श्रीमती प्रिया रमेश उरकुडे समुदाय आरोग्य अधिकारी उमराठ व उपकेंद्र वेळणेश्वर अंतर्गत सर्व आशा सेविका साक्षी कलमकर, मयुरी पेडणेकर, स्नेहल कांबळे, शाश्वती पालशेतकर, दिपाली कांबळे व उपकेंद्र मदतनीस श्रीमती विद्या जाधव इ. उपस्थित होते. Health camp completed at Velneshwar sub-centre

