• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
3 February 2026, Tuesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

कुडली शाळा नं.४ मध्ये वृत्तपत्र वाचन उपक्रमास प्रारंभ

by Guhagar News
July 14, 2023
in Guhagar
70 0
0
Newspaper reading activity started in Kudli School
137
SHARES
391
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

संदेश कदम, आबलोली संदेश कदम
गुहागर, ता. 14  : तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा कुडली नं.४ उर्दू येथे  विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, चालू घडामोडींची विद्यार्थ्यांना दररोज माहिती मिळावी, विद्यार्थ्यांना सुजाण आदर्श नागरिक घडण्यासाठी प्रेरणा मिळावी व वाचन संस्कृतीची जोपासना व्हावी, या उदात्त हेतूने शाळेमध्ये दैनंदिन वृत्तपत्र वाचन उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. हा  उपक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका व जि. प.आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त श्रीम.माधवी पाटील यांच्या प्रेरणेतून सुरू करण्यात आला आहे. या स्तुत्य उपक्रमाचे कुडली परिसरातून कौतूक करण्यात येत आहे. Newspaper reading activity started in Kudli School

Newspaper reading activity started in Kudli School

यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.प्रबोध जाधव, माजी अध्यक्ष श्री.अनिल जाधव, श्री.भरत जाधव, उत्कृष्ठ लेखणिक श्री. नंदकुमार जाधव, शिक्षणप्रेमी अमित मोहिते, उपाध्यक्षा सौ. आकांक्षा जाधव, ग्रामपंचायत सदस्या सौ .निकित जाधव या सर्वांनी या स्तुत्य आणि विद्यार्थांना प्रेरणादायक  उपक्रमाचे विशेष कौतुक करुन सहकार्य केले आहे. Newspaper reading activity started in Kudli School

यावेळी गुहागर तालुका बीट विस्तार अधिकारी  श्री.अशोक गवाणकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला व वाचनाचे महत्त्व पटवून दिले. एमपीएससी व यु.पी.एस.सी. या सारख्या स्पर्धा परीक्षेसाठी  पेपर वाचन उपयुक्त असल्याचे सांगितले. यावेळी आबलोली  बीटाचे माजी  विस्तार अधिकारी श्री.जंगम  यांनी विद्यार्थ्यांकडून पेपर वाचन करुन घेतले. तर अडूर बीटाचे विस्तार अधिकारी श्री.गोखले  यांनी सकाळ पेपर मधील प्रश्नमंजुषा घेवून सामान्य ज्ञानाचे महत्व सांगितले. त्यानंतर महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक व पडवे उर्दु केंद्राचे केंद्र प्रमुख  श्री. सुहास गायकवाड यांनी वाचनाचे महत्व सांगताना वाचनाने व्यक्ती समृध्द होते. वाचाल तर वाचाल हा मंत्र विद्यार्थांना सांगीतला.  यावेळी शाळेतील  उपशिक्षक श्री .अजित पाटील व श्री विराज सुर्वे यांचेसह विद्यार्थी बहूसंख्येने उपस्थित होते. Newspaper reading activity started in Kudli School

Newspaper reading activity started in Kudli School
Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarNewspaper reading activity started in Kudli SchoolUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share55SendTweet34
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.