१५ जुलै रोजी शिंपी समाज मंडळातर्फे आयोजन; श्रीदेव व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृह
गुहागर, ता.13 : श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ गुहागरच्या वतीने संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा शनिवार दिनांक १५ जुलै २०२३ रोजी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम श्री देव व्याडेश्वर देवस्थानच्या परशुराम सभागृहामध्ये संपन्न होणार आहे. या निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. Samadhi ceremony of Saint Shiromani Namdev Maharaj
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गुहागर तहसीलदार प्रतिभा वराळे, प्रा. रश्मी आडेकर (खरे ढेरे महाविद्यालय गुहागर), शार्दुल भावे, (श्री देव व्याडेश्वर देवस्थान, गुहागर) उपस्थित रहाणार आहेत. संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त सकाळी ८.वा. श्री संत नामदेव महाराजांची पूजा व श्री सत्यनारायणाची पूजा, सकाळी १० ते १२ वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, दुपारी ३ वा. महीलांसाठी विविध खेळ, सायंकाळी ५ वा. स्वरसाधना महिला भजन मंडळ यांचे भजन गायक – सौ. आदिती गणेश धनावडे व हळदी कुंकू समारंभ हे कार्यक्रम करण्यात येणार आहेत. Samadhi ceremony of Saint Shiromani Namdev Maharaj
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन श्री संत शिरोमणी नामदेव महाराज शिंपी समाज मंडळ गुहागरच्या वतीने करण्यात आले आहे. Samadhi ceremony of Saint Shiromani Namdev Maharaj