• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 December 2025, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

पावसाळ्यातही बोअरवेलमधून गरम पाण्याचा फवारा

by Guhagar News
July 12, 2023
in Ratnagiri
149 1
1
Hot water from borewell even in rainy season
292
SHARES
834
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

चिपळूण कोकरे येथे अनेकजण लुटताहेत स्नानाचा आनंद

गुहागर, ता. 12 : चिपळूण तालुक्यातील कोकरे-घाणेकरवाडी येथे दोन वर्षांपूर्वी खोदाई केलेल्या बोअरवेलला लागलेले गरम पाण्याचे झरे आजही निरंतर प्रवाहित आहेत. पावसाळ्याच्या दिवसांतही या बोअरवेलमधून गरम पाणी वाहत आहे. अनेकजण या परिसरात स्नानाचा आनंद लुटत आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने या ठिकाणाचा विकास झाल्यास पर्यटक येथे भेटी देतील, अशी आशा जमीन मालक संजय परशुराम दळवी यांनी व्यक्त केली आहे. Hot water from borewell even in rainy season

संजय दळवी यांनी घर बांधण्यासाठी कोकरे-घाणेकरवाडी येथे जमीन खरेदी केली होती. या जमिनीमध्ये ३० मार्च २०२१ रोजी ते बोअरवेल मारत होते. जवळपास १२० फुटांवर खुदाई करताच पाणी लागले. मात्र, भविष्यात ते पाणी अपुरे पडू नये यासाठी पुन्हा १५ फुटांवर खोल त्यांनी खुदाई केली. हे काम सुरू असताना रात्री ११ वाजेच्या सुमारास या बोअरवेलमधून उकळते गरम पाण्याचे फवारे बाहेर पडू लागले. जमिनीपासून सुमारे ५ ते ७ फूट उंचीपर्यंत ६ इंची पाईपमधून कूपनलिकेतून गरम पाणी वाहू लागल्याचे समजताच संजय दळवी आणि उपस्थितांना आश्चर्याचा धक्का बसला. Hot water from borewell even in rainy season

ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच अनेकांनी याठिकाणी भेट दिली. शासकीय अधिकारी व भूगर्भ शास्त्रज्ञ यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. मात्र, या बोअरवेलला गरम पाणी कसे लागले, याचा उलगडा अजून झालेला नाही. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर संगमेश्वर तालुक्यातील आरवली व राजवाडी, दापोली तालुक्यातील उन्हवरे येथे गरम पाण्याची कुंडे आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून या कुंडांमध्ये गरम पाण्याचा प्रवाह अखंडपणे वाहत आहे. संजय दळवी यांच्या बोअरवेललाही अशा प्रकारेच गरम पाण्याचे झरे आजही निरंतर वाहत आहेत. दळवी कुटुंबीय या शेतजमिनीत घर बांधणार होते. मात्र, येथे गरम पाण्याचे झरे लागल्याने त्यांनी हा निर्णय बदलला आहे. Hot water from borewell even in rainy season

Tags: BorewellGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiHot waterHot water from borewell even in rainy seasonLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share117SendTweet73
Guhagar News

Guhagar News

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.