• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
27 June 2025, Friday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

जिल्हास्तरीय स्पर्धेत श्री विश्वकर्मा संगीत भजन मंडळ शिरगाव प्रथम

by Ganesh Dhanawade
July 11, 2023
in Guhagar
147 1
1
District level Sangeet Bhajan Competition

प्रथम क्रमांकाचे बक्षिस वितरण करताना विनयजी नातू

288
SHARES
824
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

श्री वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ शिवणे द्वितीय तर श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत तृतीय

गुहागर, ता. 11 : भारतीय जनता पार्टी गुहागर विधानसभा मतदारसंघ आयोजित रत्नागिरी जिल्हास्तरीय संगीत भजन स्पर्धेत श्री विश्वकर्मा संगीत भजन मंडळ शिरगाव प्रथम क्रमांक, श्री वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ शिवणे द्वितीय तर श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत ने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत १५ भजनी मंडळानी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन आणिबाणी काळात कारावास भोगणारे गुहागर पालशेत येथील केशवकाका भावे, शशिकांत बिर्जे तर दापोली जालगाव येथील श्रीमती दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले होते. District level Sangeet Bhajan Competition

District level Sangeet Bhajan Competition

गुहागर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार डॉ विनय नातू यांच्या नेतृत्वाखाली पालशेत येथे श्री दत्त मंदिर शेजारील सभागृहात दोन दिवस – रात्र झालेल्या या संगीत भजन स्पर्धेत युनायटेड स्कूल चिपळूण, श्री लक्ष्मीनारायण महिला भजन मंडळ जालगाव दापोली, माऊली प्रासादिक भजन मंडळ सैतवडे रत्नागिरी, श्री कालिकामाता महिला भजन मंडळ धोपावे, श्री विठ्ठल रखुमाई प्रासादिक भजन मंडळ तवसाळ आगर, श्री गुरूदेव प्रासादिक भजन मंडळ पेढे चिपळूण, श्री सत्यनारायण प्रासादिक भजन मंडळ वेळणेश्वर, श्री काळभैरव प्रासादिक भजन मंडळ वेळणेश्वर, अंजनेश्वर प्रासादिक भजन मंडळ राजापूर, स्वरसाधना महिला भजन मंडळ गुहागर खालचापाट, विश्वकर्मा संगीत भजन मंडळ शिरगाव चिपळूण, श्री दत्त सेवक भजन मंडळ पाडले दापोली, श्री उध्दाळेश्वर भजन मंडळ अंजनवेल, श्री दत्तगुरू प्रासादिक भजन मंडळ आंजर्ले दापोली, श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत, श्री वक्रतुंड प्रासादिक भजन मंडळ शिवणे अशा १६ भजन मंडळांनी सहभाग घेतला होता. District level Sangeet Bhajan Competition

या संगीत भजन स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त श्री विश्वकर्मा संगीत भजन मंडळ शिरगाव, बुवा अनिकेत चव्हाण यांना रोख रक्कम २५ हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र.  द्वितीय क्रमांक प्राप्त श्री वक्रतुंड भजन मंडळ शिवणे गुहागर बुवा संतोष मेस्त्री यांना रोख रूपये १५ हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांक प्राप्त श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत गुहागर बुवा महेश होळंब यांना रोख रक्कम १० हजार, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ट पखवाज वादक मिनार पाटील (पालशेत), चकवा सुमित डेरवणकर (शिरगाव), कोरस श्री दत्त प्रासादिक भजन मंडळ पालशेत, तबला वादक रोहित डेरवणकर (शिरगाव), उत्कृष्ट गायन अनिकेत चव्हाण (शिरगाव) यांना रोख रक्कम प्रत्येकी १ हजार, सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा सरकारची कामगिरी, विविध योजनांचा दाखला देत रचून सादरीकरण केलेल्या गीतांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. त्यामध्ये धोपावे भजन मंडळ बुवा तेजल जाधव यांनी गायलेल्या गीताला विशेष पारितोषिक देण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण संगीत अलंकार अजित गोसावी बुवा (कणकवली), तालमणी गणेश सावंत (विरार) यांनी केले. District level Sangeet Bhajan Competition

District level Sangeet Bhajan Competition

या संगीत भजन स्पर्धेदरम्यान तहसिलदार प्रतिभा वराळे, देशाच्या सीमेवर ४० वर्षे सेवा बजावून सेवा निवृत्त झालेले कोतळूक येथील बाबाजी शिगवण, राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आलेले आबलोली येथील प्रगतशील शेतकरी सचिन कारेकर, ह.भ.प.कीर्तनकाळ डॉ. श्रीपाद जोगळेकर, ह.भ.प.कीर्तनकार प्रा. सुमंत भिडे, राज्यस्तरीय संगीत नाट्य स्पर्धेमध्ये गेली अनेक वर्ष सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारे परस्पर सहाय्य नाट्य मंडळ वाघांबे यांना शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. District level Sangeet Bhajan Competition

स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभावेळी माजी आमदार डॉ विनय नातू, जि.प. माजी उपाध्यक्ष प्रशांत शिरगावकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रश्मी पालशेतकर, भाजपा गुहागर तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे, मंगेश जोशी, श्रीकांत महाजन, स्पर्धा प्रमुख माजी उपसभापती विठ्ठल भालेकर, सचिन ओक, विनायक सुर्वे, संगम मोरे, महेश तोडणकर, मंगेश रांगळे, रूपेश विचारे, श्रीकांत मोरे, ज्योती परचुरे, जानवळे सरपंच जान्हवी विखारे, मधुकर असगोलकर, अनिकेत चाळके, दिपक मोरे, चंद्रहास चव्हाण, दत्तराज पाटील, राजु नरवणकर, सुधिर कनगुटकर, विजय भुवड, संदिप साळवी आदी उपस्थित होते. District level Sangeet Bhajan Competition

Tags: Bharatiya Janata PartyBJPDistrict level Sangeet Bhajan CompetitionGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्याभाजपभारतीय जनता पार्टीमराठी बातम्यालोकल न्युज
Share115SendTweet72
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.