गुहागर, ता. 11 : श्रीदेव गो. कृ. मा. विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय गुहागर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयातील प्री-एलिमेंटरी परीक्षेमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला. felicitating successful students in pre-elementary examination

टिळक विद्यापीठाच्या इंग्रजी विषयाच्या प्री-एलिमेंटरी परीक्षेमध्ये श्रीदेव गो. कृ. मा. विदयामंदिरचा निकाल 100 टक्के लागला आहे. या परीक्षेत कोलकांड जिया मंगेश हिचा 82 गुण मिळवून प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक पावरी दीप प्रशांत 79 गुण तर तृतीय क्रमांक (विभागून) बाणे विवेक राजेंद्र 78 गुण व गोयथळे आर्या मंदार 78 गुण प्राप्त केले आहेत. या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त सत्कार करण्यात आला. felicitating successful students in pre-elementary examination

यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. एस. एस कांबळे यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका सौ. एस.एस. कांबळे यांनी परीक्षेचा निकाल जाहीर करुन सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. यावेळी स्कूल कमिटी अध्यक्ष श्री. दिपक कनगुटकर, पर्यवेक्षक श्री. एम.एस. गंगावणे, श्री.व्ही.ए. ढोणे, श्री. एस. ए. कांबळे आदी उपस्थित होते. felicitating successful students in pre-elementary examination
