• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
29 December 2025, Monday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

एक  सही संतापाची…

by Mayuresh Patnakar
July 9, 2023
in Guhagar
377 3
0
MNS innovative initiative in Guhagar on changing politics
740
SHARES
2.1k
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

बदलत्या राजकारणावर गुहागरमध्ये मनसेचा अभिनव उपक्रम

दिनेश चव्हाण, गुहागर
गुहागर, ता. 09 : सध्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ते पाहता सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. हे हिडीस राजकारण असून जनतेचा विकास दूर मात्र, स्वतःच्या फायद्यासाठी पक्ष बदलून आपली राजकीय पोळी भाजत आहेत. ही भावना जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी गुहागर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने एक सही संतापाची… अशा प्रकारचा एक उपक्रम नूतन तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर  यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला आहे. MNS innovative initiative in Guhagar on changing politics

गुहागर मनसे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर  यांनी येथील सूत्रे हाती घेतल्यावर सर्वसामान्यांच्या प्रश्नांना हात घालून ते सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत. याचाच एक भाग म्हणून त्यांनी अंजनवेल येथील कोकण एल.एन.जी. कंपनीचे समुद्रातील ब्रेक वाँटरचे काम करणाऱ्या एल.अँड.टी. कंपनीमध्ये काम करणाऱ्या कामगारांना पूर्व सूचना न देता तडकाफडकी कामावरुन काढून टाकल्याचा मुद्दा हाती घेत येथील कंपनी व्यवस्थापनाला जाब विचारुन कामगारांचा प्रश्न सोडविला आहे. MNS innovative initiative in Guhagar on changing politics

MNS innovative initiative in Guhagar on changing politics

यानंतर सध्या एक सही संतापाची हा उपक्रम तालुक्यात सुरु केला आहे. सध्याचे राज्यातील राजकारण हे लोकशाहीच्या विरुध्द दिशेने जात आहे. पक्षांतर करणे, गट स्थापन करणे, सरकारला पाठिंबा देणे असे राजकीय प्रकार सुरु आहेत. या राजकीय खेळात सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे राजकारण्यांचे दुर्लक्ष होत आहे. हे राजकारण सर्वसामान्यांना समजावे व त्यांच्या संतप्त भावनांना वाट मोकळी करुन द्यावी, आपली मते मांडावीत यासाठी एक सही संतापाची हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती सुनील हळदणकर  यांनी दिली. MNS innovative initiative in Guhagar on changing politics

यासाठी त्यांना मनसेचे संपर्क प्रमुख प्रमोद गांधी, उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहकार्य करत आहेत. दरम्यान, १२ जुलै रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने मनसे पदाधिकाऱ्यांकडून स्वागताची जोरदार तयारी सुरु असल्याचे हळदणकर यांनी सांगितले. यावेळी मनसेची राजकीय भूमिका काय असेल? हे प्रत्यक्षात राज ठाकरे स्पष्ट करणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. MNS innovative initiative in Guhagar on changing politics

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsMNS innovative initiative in Guhagar on changing politicsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share296SendTweet185
Mayuresh Patnakar

Mayuresh Patnakar

1996 पासून पत्रकारिता करणारे मयुरेश पाटणकर यांनी मास्टर्स इन जर्नालिझम (एम.जे.) ही पदवी घेतली आहे. दै. पुढारी, दै. सकाळ मध्ये बातमीदारी करतानाच त्यांनी साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळमध्येही लिखाण केले. चार वर्ष दै. सकाळचे उपसंपादक म्हणूनही ते कार्यरत होते. विविध विषयांवर लिखाण करण्याची त्यांची हातोटी सर्वांना परिचित आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.