रत्नागिरी, ता. 08 : कोकणचे पहिले आयर्नमॅन व चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये कझाकिस्तानमधून आज रविवार दि. ९ जुलै रोजी चिपळुणात दाखल होणार आहेत. चिपळूण सायकलिंग क्लब आणि आरोग्यम् लॅब यांच्या संयुक्त विद्यमाने संध्याकाळी ४ वाजता त्यांची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा सत्कार चिपळुणचे आमदार शेखर निकम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. Honoring the Ironman Tejanand Ganapatye

चिपळूण शहरात मार्कंडी मठापासून नगरपालिकेपर्यंत वाजत- गाजत मिरवणूक काढली जाणार आहे. चिपळूण सायकलिंग क्लबचे सदस्य डॉ. तेजानंद गणपत्ये यांनी २ जुलै रोजी कझाकिस्तान येथे झालेल्या फुल आयर्नमॅन स्पर्धेत भाग घेऊन ही खडतर स्पर्धा दिलेल्या वेळेच्या आत पूर्ण केली. आयर्नमॅन होण्याकरिता पोहणे, सायकलिंग आणि धावणे या तिन्ही कृती एका पाठोपाठ करायच्या असतात. डॉ. तेजानंद गणपत्ये 3.9 किलोमीटर पोहले, १८० किलोमीटर सायकलिंग केले आणि 42 किलोमीटर धावले आणि १५ तास १७ मिनीटे व ४२ सेकंदांत आयर्नमॅनचा किताब जिंकले. याकरिता त्यांनी कठोर परिश्रम घेतले आहेत. Honoring the Ironman Tejanand Ganapatye

कोकणात प्रथमच डॉ. गणपत्ये यांनी आयर्नमॅनचा किताब जिंकताना कोकणातील युवकांसमोर आदर्श ठेवला आहे. त्यांच्या मिरवणूक व सत्कार सोहळ्याला जास्तीत जास्त सायकलपट्टू, खेळाडू, क्रीडा प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन चिपळूण सायकलिंग क्लब आणि आरोग्यम् लॅबने केले आहे. Honoring the Ironman Tejanand Ganapatye
