• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
18 June 2025, Wednesday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

तळवली येथील संतोष आग्रे  यांच्या शेतात हळद  लागवड

by Ganesh Dhanawade
July 8, 2023
in Guhagar
145 1
0
Cultivation of Turmeric in the field of Talwali Agre
285
SHARES
813
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

हळदीचा नाविन्यपूर्ण प्रकल्प तांत्रिक मार्गदर्शनाने यशस्वी होणार! – प्रशांत राऊत

गुहागर, ता. 08 : तालुक्यासह संगमेश्वर, चिपळूण ,खेड या चारही तालुक्यात जि.प. रत्नागिरी च्या कृषी विभागाच्या वतीने हळद लागवडीचा उपक्रम सुरू आहे. या नाविन्यपूर्ण उपक्रमतर्गतचा हा प्रात्यक्षिकाचा प्रकल्प  SK-4 या हळदीच्या वाणाचे प्रणेते सचिन कारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी यांच्या तांत्रिक सहकार्याने यशस्वी होणार,असा आशावाद गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी व्यक्त केला. ते  पंचायत समिती गुहागरच्या SK-4 हळद  लागवडीचा नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत तळवली येथील शेतकरी संतोष आग्रे  यांच्या शेतावर  प्रात्यक्षिकातून प्रशिक्षण या उपक्रमाच्या वेळी त्यांनी आपले मत व्यक्त केले. Cultivation of Turmeric in the field of Talwali Agre

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पुजार साहेब यांच्या संकल्पनेतून व सुचनेनुसार हा 4 तालुक्यासाठीचा प्रकल्पातील सहभागी  शेतक-यांच्या शेतावरचा 10 गुंठ्याचा डेमो प्रात्यक्षिकाचा प्रकल्प राबविण्यात येत आहे. स्पेशल कोकण -4 या नवीन संशोधित केलेल्या हळदीच्या वाणाचे प्रात्यक्षिक व प्रयोग जसे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे सुरू आहेत. तसेच प्रयोग शेतक-यांच्या शेतावर  यापूर्वी  गेल्या दोन वर्षात जि.प.रत्नागिरीच्या कृषी विभागाच्या अनुदानातून मंडणगडसह गुहागर  पंचायत समितीच्या वतीने  दोन्ही तालुक्यात  यशस्वीरित्या केले गेले. यावर्षीही विद्यापीठासह चार तालुक्यातील  मोजक्याच शेतक-यांच्या शेतावर हे प्रात्यक्षिक घेण्यात येत आहेत. Cultivation of Turmeric in the field of Talwali Agre

या प्रकल्पातील  यशापयशावरच जिल्ह्यात  हळद लागवड मोठ्याप्रमाणात करायची कि नाही, हे अवलंबून राहणार आहे. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शात्रज्ञ डॉ. प्रफुल्ल माळी व SK-4 चे प्रणेते सचिन कारेकर हेसुद्धा  वेळोवेळी ह्या लागवडीला भेट देवून मार्गदर्शन करणार आहेत. Cultivation of Turmeric in the field of Talwali Agre

यावेळी तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर, SK-4 चे प्रणेते सचिन कारेकर, कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर, शेतकरी संतोष आग्रे, अॅड.संदीप आग्रे, कृषी पर्यवेक्षक श्री.कुलकर्णी, ग्रामविकास अधिकारी एस.आर.बागूल, कृषी सहाय्यक अमित शेळके, दिपक शेवडे, लिपिक प्रदीप चव्हाण, SK-4 हळद रोपवाटीकेचे वसंत मुकनाक,  यांच्यासह इतर शेतकरी उपस्थित होते. Cultivation of Turmeric in the field of Talwali Agre

Tags: Cultivation of Turmeric in the field of Talwali AgreGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarSK-4Turmeric in the fieldUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share114SendTweet71
Ganesh Dhanawade

Ganesh Dhanawade

दै. रत्नागिरी टाईम्स, दै. प्रहार, दै. सागर या वृत्तपत्रातून बातमीदारी करत आहेत. त्यांना पत्रकारीतेबद्दल विश्र्वसंत गाडगेमहाराज पत्रकार भूषण राज्यस्तरीय पुरस्कार, नवनिर्मितीचा राज्यस्तरीय आदर्श पत्रकाररत्न पुरस्कार असे पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. गेली 19 वर्ष गणेश धनावडे पत्रकारीता क्षेत्रात कार्यरत आहेत.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.