भा.अ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डेची विद्यार्थिनी
गुहागर, ता. 08 : भा.अ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डेची (B.ED) विद्यार्थिनी आणि गुहागर हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री.विश्वास शंकर माने यांच्या धाकट्या सुनबाई सौ. प्रियांका मयुरेश माने या महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परीक्षा २०२३ (सेट ) उत्तीर्ण झाल्या आहेत. ही परिक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठा अंतर्गत घेण्यात येते. त्याबद्दल प्रबुद्ध विचार मंच सावर्डे यांच्या वतीने पुष्पगुच्छ आणि मिठाई देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. Priyanka Mane Passed Set Exam

भा.अ. तथा भाईसाहेब सावंत अध्यापक महाविद्यालय सावर्डेची विद्यार्थिनी सौ.प्रियांका मयुरेश माने या सहाय्यक प्राध्यापक पदासाठीच्या महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत यु.जी.सी. नवी दिल्ली मान्यता प्राप्त नोडल एजन्सी आयोजित महाराष्ट्र राज्यस्तरीय पात्रता परिक्षा (सेट २०२३ )उत्तीर्ण झाल्या आहेत. Priyanka Mane Passed Set Exam

यावेळी सौ.प्रियांका मयुरेश माने या सातत्याने शैक्षणिक क्षेत्रात आपला शैक्षणिक आलेख चढता ठेवण्यात यशस्वी ठरल्या आहेत. सौ. माने यांचे सध्याचे M.A. D.ED, B.ED तसेच टीईटी पेपर १ आणि टीईटी पेपर २ आणि सेट (मराठी) २०२३ अशी शैक्षणिक अर्हता आहे. सौ. माने यांचे संपूर्ण जिल्हातून कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. Priyanka Mane Passed Set Exam
