कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी, ता. 05 : नवीन शैक्षणिक धोरणात इंटरॅक्टिव्ह रूमचा समावेश आहे. त्यानुसार पटवर्धन हायस्कूलमध्ये कोकणातील पहिल्या इंटरॅक्टिव्ह रूमचे उद्घाटन करताना आनंद होतोय. या रूमचा पुरेपूर उपयोग करा. अॅक्टीव्हीटी बेस, कौशल्याधारित शिक्षण द्यायचे आहे. समानतेकडे घेऊन जाणारे शिक्षण धोरण आले आहे. मुलाकडे जे आहे ते मुलाने स्वतः शोधायचे आहे, त्याला आपण मदत करायची आहे, यामुळे मुले यश मिळवतील, असे प्रतिपादन कोकण विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी केले. Inauguration of Interactive Room in Patvardhan School
श्री. म्हात्रे यांनी बुधवारी सकाळी १० वाजता पटवर्धन हायस्कूलला भेट दिली. त्या वेळी ते बोलत होते. भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह सुनील वणजु यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी मुख्याध्यापक राजेंद्र कांबळे, माजी मुख्याध्यापक विजय वाघमारे उपस्थित होते. Inauguration of Interactive Room in Patvardhan School

श्री. म्हात्रे म्हणाले की, यापूर्वी मी शाळेत येऊन गेलो होतो, तेव्हा शिक्षक होतो, आता आमदार म्हणून आलोय. तुमच्या आशीर्वादामुळेच आमदार झालो. आपल्या शिक्षकांची कामे करताना आनंद होतोय. कोकणातील शिक्षकांच्या सर्व समस्या सोडवत आहोत. संचमान्यता असो वा अन्य कोणताही प्रश्न. अनुदानाचा प्रश्न सोडवू. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे प्रश्न मांडू. शिक्षणाधिकारी, संचालक, आयुक्तांकडे प्रश्न मांडू, असेही श्री. म्हात्रे म्हणाले. मी अलिकडेच लंडनला गेलो होतो, तिथे वर्गात बोर्ड नव्हते. टीव्ही स्क्रिन होता. मुले घोळक्याने शिकत होती. शिक्षकाने कमी बोलायचे व अॅक्टीव्हीटी बेस शिक्षण द्यायचे. सर्व दप्तरेही शाळेतच असतात. कौशल्यावर आधारित शिक्षण दिले जाते. आपल्या नवीन शैक्षणिक धोरणात याचा समावेश आहे. Inauguration of Interactive Room in Patvardhan School
कार्यवाह सुनील वणजु यांनी सांगितले की, इंटरॅक्टिव्ह रूम कोकणात प्रथमच विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आमदार म्हात्रे यांच्या ते कायम आमच्या पाठिशी आहेत. शासकीय कामे पाठपुराव्यामुळे पूर्ण होतात. मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. ६ कोटीची त्यासाठी आपण व कंपन्यांचा सीएसआर फंड द्यावा. Inauguration of Interactive Room in Patvardhan School

कार्यक्रमाला शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी आमदार म्हात्रे यांचे स्वागत केले. सूत्रसंचालन प्र. प्राचार्य मधुरा पाटील यांनी केले. अजित मुळीक यांनी श्री. म्हात्रे यांचा परिचय करून दिला. यावेळी श्री. म्हात्रे यांच्यासमवेत विजय पाटील, विलास कोळेकर, राजेश जाधव, लतेश नांदगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. Inauguration of Interactive Room in Patvardhan School
काय आहे इंटरॅक्टिव्ह रूम
या वर्गात लाखो रुपयांची स्क्रीन आहे. येथे एकाच वेळेस १०० विद्यार्थी बसू शकतात. इंटरनेटवर गुगल ब्राऊजिंग करून शैक्षणिक साईट्स पाहू शकतात. यू- ट्यूबवर व्हिडिओ पाहू शकतात. दिल्ली किंवा परदेशांतून शैक्षणिक विषयांवरची व्हिडिओ कॉन्फरन्स होऊ शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांकडून थेट मार्गदर्शन घेऊ शकतात. Inauguration of Interactive Room in Patvardhan School
