• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू

by Manoj Bavdhankar
July 4, 2023
in Guhagar
81 1
0
Admission started in Velaneshwar college
160
SHARES
457
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स व कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचा समावेश

गुहागर, ता. 04 : तालुक्यातील वेळणेश्वर अभियांत्रिकी महाविद्यालयात (Velaneshwar College of Engineering) चालू शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ची अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे. आठवड्यातील सोमवार ते रविवार ह्या कालावधीत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालू राहील. त्याचप्रमाणे औद्योगिक व्यवसायातील आवश्यकता व विद्यार्थ्यांची आवड लक्षात घेऊन  महाविद्यालयात चालू शैक्षणिक वर्षापासून कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या दोन नवीन पदवी शाखाही सुरू करण्यात आले आहेत. Admission started in Velaneshwar college

इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या दोन्ही अभ्यासक्रमांचा एकत्रित अभ्यास करता येईल. त्यामध्ये विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञानाचा जसे 5G, 6G तंत्रज्ञान, चिप डिझाईन, रोबोटिक्स, आय.ओ.टी यांचा अभ्यास होईल. त्याचबरोबर कॉम्प्युटर इंजिनिअरिंगचे मशिन्स लर्निग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डाटा सायन्स यांचाही अभ्यास होईल. Admission started in Velaneshwar college

तसेच कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या अभ्यासक्रमामध्ये डाटा सायन्स, वेब डिझायनिंग, सायबर सिक्युरिटी, मशिन लर्निंग तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांचा अभ्यास करता येईल. या दोन्ही शाखांमधून अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना टेस्टिंग इंजिनिअर, सॉफ्टवेअर डेव्हेलपर, सिस्टिम अॅनालिस्ट, सिस्टिम कंट्रोल इंजिनिअर, टेलिकम्युनिकेशन इंजिनियर, एम्बडेड सिस्टिम डिझायनर अशा नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

ग्रामीण भागात राहूनही औद्योगिक क्षेत्रासाठी अनुकुल अशी शिक्षण पध्दती अवलंबिल्याबद्दल वेळणेश्र्वरच्या महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाला बेस्ट इंडस्ट्रियल इंटरफेस कॉलेज ऑफ द ईयर या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार इंडियन अचिव्हर्स फोरम या संस्थेतर्फे देण्यात आला आहे. Admission started in Velaneshwar college

त्यामुळे या महाविद्यालयात अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या दोन शाखांसोबत मेकॅनिकल अभियांत्रिकी, सिव्हिल अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी, इन्स्ट्रुमेटेंशन अभियांत्रिकी या शाखाही उपलब्ध आहेत. तरी विद्यार्थ्यांनी या पदवी शाखांचा जास्तीतजास्त फायदा करून घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. Admission started in Velaneshwar college

Tags: Admission started in Velaneshwar collegeGuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युजवेळणेश्वर महाविद्यालय
Share64SendTweet40
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.