• गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क
7 February 2026, Saturday
Guhagar News
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health
No Result
View All Result
Guhagar News

खामशेत गावाचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा

by Manoj Bavdhankar
July 2, 2023
in Guhagar
171 2
0
'Agricultural Day' celebrated at Khamshet
336
SHARES
961
VIEWS
Share on FacebookShare on Whatsapp

कृषीदिनानिमित्त बीडीओ प्रशांत राऊत यांचे प्रतिपादन

गुहागर, ता. 02 :  पावसाच्या अनियमितता व विलंबाचे कारण कोणतं असेल तर ते वृक्षतोड.  अशी चिंता व खामशेत गावाचा आदर्श सगळ्यांनीच घ्यावा यासाठी आपण सगळे प्रयत्न करतोय, असे प्रतिपादन गट विकास अधिकारी प्रशांत राऊत यांनी केले.  ते 1 जुलै 2023 रोजी पंचायत समिती गुहागर व ग्रामपंचायत खामशेतच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. ‘Agricultural Day’ celebrated at Khamshet

खामशेत येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जन्मदिनानिमित्त ‘कृषी दिन’  साजरा करण्यात आला. या कृषिदिनानिमित्त वृक्षलागवड करण्यात आली. प्रारंभी गटविकास अधिकारी प्रशांत राऊत यांच्या हस्ते दिपप्रजवन करून व  तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर यांच्या हस्ते स्व.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करून  कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रत्येक कुटुबांना एक असे सुपारीच्या रोपांचेही  वाटप करण्यात आले. ‘Agricultural Day’ celebrated at Khamshet

खामशेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असल्याने खामशेत गावातून जाणा-या रस्त्याच्या कडेला  75  जांभूळ रोपांची लागवड करण्यात आली. कृषीदिन कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन  कृषी विस्तार अधिकारी गजेंद्र पौनीकर  यांनी केले. यावेळी सहाय्यक गट विकास अधिकारी  प्रमोद केळस्कर, सामाजिक वनिकरण विभागाचे वनपाल अमित निमकर, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर  व सरपंच मंगेश सोलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. ‘Agricultural Day’ celebrated at Khamshet

यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रशांत राऊत, सहाय्यक गट विकास अधिकारी प्रमोद केळसकर, तालुका कृषी अधिकारी अमोल क्षिरसागर, सरपंच मंगेश सोलकर, उपसरपंच विष्णूजी पारदळे, माजी जि.प.सदस्य अशोक पारदळे, सामाजिक वनिकरण विभागाचे वनपाल अमित निमकर, कृषी अधिकारी आर.के.धायगुडे, वनरक्षक अरविंद मांडवकर, संजय धुंडगे, ग्रामपंचायत सदस्य सिद्धी नरळकर, अस्मिता कदम, वर्षा माचिवले, रमेश पारदळे, ग्रामसेविका रोहिनी वारे, पोलीस पाटील संजय माने, कृषी सहाय्यक विजयकुमार शिंदे  तसेच शेतकरी ग्रामस्थ, बचत गटाच्या महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. ‘Agricultural Day’ celebrated at Khamshet

Tags: GuhagarGuhagar Newsguhagar news in marathiLatest Marathi NewsLatest NewsLatest News on GuhagarMarathi NewsNews in GuhagarUpdates of Guhagarगुहागर मराठी बातम्याटॉप न्युजताज्या बातम्यामराठी बातम्यालोकल न्युज
Share134SendTweet84
Manoj Bavdhankar

Manoj Bavdhankar

वडिलांपासून पत्रकारीतेचा वारसा जपणारे मनोज तथा भैय्या बावधकर वृत्तपत्र वितरक म्हणून सर्वाना परिचित आहेत. लोकसत्ता, महाराष्ट्र टाईम्स, दै. पुढारी, दै. सागर, दै. रत्नागिरी टाईम्स अशा अनेक वृत्तपत्रांमधुन त्यांनी लिखाण केले आहे. व्यापक संपर्क असलेले व्यक्तिमत्त्व अशी त्यांची आज जिल्ह्यात ओळख आहे.

  • गुहागर न्युज : डिजिटल न्युज माध्यम
  • संपर्क

Copyright © 2020-2023 Guhagar News.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • Guhagar
  • Ratnagiri
  • Maharashtra
  • Bharat
  • Politics
  • Sports
  • Travel
  • Health

Copyright © 2020-2023 Guhagar News.