आमदार भास्कर जाधव, तहसीलदारांना दिले निषेधाचे निवेदन
गुहागर, ता. 02 : शिंदे फडणवीस सरकारद्वारे आकस व सूडबुध्दीने विरोधकांना त्रास देणे, विविध तपासयंत्रणांना हाताशी धरून कारवाया करणे. विकासकामांना स्थगिती देणे. राज्यातील प्रस्तावित प्रकल्प राज्याबाहेर जाणे. कायदा व सुव्यवस्था ढासळून होत असलेल्या दंगली. महिलांवर वाढलेले अत्याचार या सर्वांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज मोर्चा काढला आहे. असे प्रतिपादन आमदार भास्कर जाधव यांनी तहसीलदार कार्यालयात केले. Shinde government has failed at all levels
गुहागरात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर पोचल्यावर आमदार भास्कर जाधव यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. या निवेदनात म्हटले आहे की, शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर येताच त्यांनी माजी मुख्यमंत्री, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख श्री. उध्दवसाहेब ठाकरे व त्यांच्या परिवाराची सुरक्षा कमी केली. राज्यात अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार असताना कुठेही दंगली घडल्या नाहीत. गेल्या वर्षभरात सत्ताधारी पक्षाची ताकद नाही अशा ठिकाणी दंगली घडवून आणल्या जात आहेत. समाजासमाजामध्ये कटुता निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे का अशी शंका सर्वसामान्य जनतेच्या मनात निर्माण झाली आहे. मविआच्या काळात एप्रिल 2021 च्या अर्थसंकल्पातील कोट्यावधी रूपयांच्या विकास कामांना या सरकारने स्थगिती दिली आहे. कोकणाबाबत दुजाभाव दाखवून जून २०२२ पासून विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या कोणत्याही नवीन कामांना मंजुरी दिलेली नाही. ‘शासन आपल्या दारी’ योजनेत अगोदरच निवड झालेल्या अंध, दिव्यांग तसेच बचतगटांच्या महिलांना प्रसिध्दीसाठी शासकीय यंत्रणेमार्फत शेकडो किलोमीटरचा प्रवास करून कार्यक्रमस्थळी नेवून फसवणूक केली. कोकणात मोठ्या संख्येने असलेल्या ओबीसी आणि कुणबी समाजाच्या तिल्लोरी कुणबी समाजाचे दाखले देणे बंद केले आहे. Shinde government has failed at all levels
२०१४ मध्ये रामपूर-मार्गताम्हाने माळरानावर एमआयडीसी मंजूर करून त्या ठिकाणी प्रदूषणविरहित टेक्स्टाईल पार्क, फूड पार्क, लॉजिस्टीक बेस उदयोग आणण्याचा निर्णय घेतला होता. परंतु वारंवार पाठपुरावा करूनही या शासनाने 5 हजारपेक्षा जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या एमआयडीसीला चालना दिलेली नाही. कोकणातील मच्छीमार समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी माथाडी कामगारांच्या धर्तीवर मच्छीमार कल्याणकारी मंडळ (बोर्ड) स्थापन करून घेतले. परंतु, या बोर्डाला अद्याप चालना देण्यात आलेली नाही. कोकणात स्वतंत्र मत्स्य विद्यापीठाची स्थापना करू, असे आश्वासन विधानसभेत देवूनही त्याची पूर्तता करण्यास हे सरकार दिरंगाई करीत आहे. चिपळूण व खेड या दोन तालुक्यांना जोडणाऱ्या करंबवणे ते बहिरवली यादरम्यानच्या खाडीपुलाचे काम प्रलंबित ठेवले आहे. रत्नागिरी येथील महिला रूग्णालयाचे बांधकाम पूर्ण होवूनदेखील हे रूग्णालय अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. Shinde government has failed at all levels
महागाई वाढली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्यात. महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या बाबतीत सरकार संवेदनशील नाही. जानेवारी 2023 ते मे 2023 या पाच महिन्यात राज्यातील 3 हजार 152 मुली व महिला बेपत्ता आहेत. 10 वर्ष केंद्रात सत्तेत असुनही भाजप सरकारला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण करता आलेला नाही. जिल्हा शासकीय रुग्णालय व्हेंटीलेटरवर आहे. जिल्ह्यात तलाठी, ग्रामसेवकांची पदे रिक्त आहेत. शिक्षकांची 1019 पदे रिक्त असून अनेक शाळांमध्ये शिक्षक नाहीत. राज्यात विविध ठिकाणी अपघातात मृत झालेल्यांना राज्य सरकारने मदत केली. मात्र माझ्या मतदारसंघातील हेदवी गावामधील एकाच कुटुंबातील 10 जणांचा मृत्यू होवूनही राज्य सरकारने मदत केली नाही. मी उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याने सर्वसामान्य कुटुंबाला शासन मदत करत नाही. या सरकारचा आम्ही निषेध करत आहोत. Shinde government has failed at all levels