गुहागर, ता. 30 : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र व गोवा राज्यातील विविध विषयांच्या सहाय्यक प्राध्यापक पदासाठी घेण्यात येणारी राज्यस्तरीय पात्रता सेट परीक्षा काही महिन्यांपूर्वी झाली होती. सदर सेट परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे (College Patpanhale) महाविद्यालयाचे प्राध्यापक श्री. एस. पी. वासनिक हे इंग्रजी विषयात उत्तीर्ण झाले आहेत. Vasnik of Patpanhale College succeeded in the set exam

न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पाटपन्हाळे विद्यालयात गेली अनेक वर्ष प्रा. श्री.एस.पी. वासनिक हे उत्तम भाषा शैलीत इंग्रजी विषयाचे अध्यापन करीत आहेत. सेट परीक्षेत प्रा.वासनिक यांनी सुयश संपादन केल्याबद्दल पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्री.सुधाकर चव्हाण, प्राचार्य श्री.एम.ए. थरकार, प्राध्यापक – शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले. Vasnik of Patpanhale College succeeded in the set exam
